For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युपी वॉरियर्सच्या कर्णधारपदी लेनिंग

06:52 AM Jan 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
युपी वॉरियर्सच्या कर्णधारपदी लेनिंग
Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisement

2026 च्या महिलांच्या प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेला 9 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या युपी वॉरियर्स संघाने ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार मेग लॅनिंगची कर्णधारपदी निवड केली आहे.

2026 ची ही चौथी महिलांची प्रीमियर लीग टी-20 स्पर्धा असून यापूर्वी झालेल्या तीन स्पर्धांमध्ये मेग लॅनिंगने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले होते. युपी वॉरियर्सच्या फ्रांचायझींने लॅनिंगची कर्णधारपदी निवड केल्याची घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी युपी वॉरियर्सने मेग लॅनिंगला 1.9 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले आहे.

Advertisement

मेग लॅनिंगने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत ऑस्ट्रेलियन महिला संघाला 7 वेळा विश्वचषक जिंकून दिले आहे. मेग लॅनिंगला क्रिकेटचा दीर्घ अनुभव असल्याने युपी वॉरियर्सला त्याचा अधिक लाभ मिळेल, असे या संघाच्या फ्रांचायझींनी म्हटले आहे. 2026 ची महिलांची प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाईल. पहिला टप्पा 9 ते 17 जानेवारी दरम्यान नवी मुंबई तर दुसरा टप्पा 19 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान बडोदा येथे होईल.

Advertisement
Tags :

.