For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लंकेची विहांगा स्पर्धेतून बाहेर

06:22 AM Aug 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
लंकेची विहांगा स्पर्धेतून बाहेर
Advertisement

वृत्तसंस्था, कोलंबो

Advertisement

28 ऑगस्टपासून खेळविल्या जाणाऱ्या 2026 च्या एसीसी महिलांच्या टी-20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतून लंकन संघातील अष्टपैलु देवमी विहांगाला दुखापतीमुळे बाहेर पडावे लागत आहे.

उजव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तिला या स्पर्धेत खेळता येणार नाही. आता लंकन महिला संघात विहांगाच्या जागी डावखुरी फिरकी गोलंदाज मिपागेला बदली खेळाडू म्हणून संधी दिली आहे. या स्पर्धेसाठी चमारी अटापटूच्या नेतृत्वाखाली लंकेचा 15 सदस्यांचा संघ यापूर्वीच जाहीर केला आहे. सदर स्पर्धेमध्ये लंकेचा अ गटात समावेश आहे. सदर स्पर्धेला 28 ऑगस्टपासून हाँगकाँग आणि थायलंड यांच्या सामन्याने प्रारंभ होत आहे तर भारत आणि पाक महिला संघातील सामना 5 सप्टेंबरला खेळविला जाणार आहे. या स्पर्धेमध्ये अ गटात भारत, पाकिस्तान, हाँगकाँग आणि थायलंड तर ब गटात विद्यमान विजेता श्रीलंका, बांगलादेश, इंडोनेशिया आणि यजमान संयुक्त अरब अमिरात यांचा समावेश आहे. लंकेचा या स्पर्धेतील पहिला सामना 29 ऑगस्टला यजमान संयुक्त अरब अमिरातबरोबर होईल.

Advertisement

Advertisement
Tags :

.