महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सनथ जयसूर्याच्या मार्गदर्शनात लंकन संघ सुसाट!

06:55 AM Nov 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मायदेशात सलग पाचवा मालिकाविजय : दुसऱ्या वनडेत लंकेची न्यूझीलंडवर मात

Advertisement

वृत्तसंस्था/ पल्लीकेले (श्रीलंका)

Advertisement

पल्लीकल येथील पीएलए स्टेडियमवर पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंडचा तीन गडी राखून पराभव केला. या विजयासह लंकेने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत श्रीलंकेने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. कमी धावसंख्येच्या सामन्यात, कुसल मेंडिसने नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे, श्रीलंका संघाचा विजयरथ सनथ जयसूर्याच्या कोचिंगखाली काही महिन्यांपासून सुसाट धावताना दिसत आहे. जयसूर्याच्या मार्गदर्शनात श्रीलंकेने मायदेशात सलग पाचवी द्विपक्षीय वनडे मालिका जिंकली आहे. उभय संघातील तिसरा व शेवटचा सामना दि. 19 रोजी होईल.

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात पावसाचा परिणाम दिसून आला. त्यामुळे सामना 47-47 षटकांचा करण्यात आला. या सामन्यात श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किवी संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि 45.1 षटकांत 209 धावांवर गारद झाला. न्यूझीलंडकडून मार्क चॅपमनने सर्वाधिक 76 धावा केल्या. याशिवाय, मिचेल हेने 49 तर विल यंगने 26 धावा फटकावल्या. इतर किवीज खेळाडू मात्र लंकन गोलंदाजासमोर हतबल ठरले.

210 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवातही खास झाली नाही. संघाने पहिली विकेट 23 धावांवर आणि दुसरी विकेट 41 धावांवर गमावली. अशा परिस्थितीत कुसल मेंडिसने 102 चेंडूत 74 धावांची नाबाद खेळी खेळून विजय मिळवला. त्याच्या खेळीत 6 चौकारांचा समावेश होता. सलामीवीर पथुम निसंका 28 व अविष्का फर्नांडो 5 यांनी निराशा केली. मधल्या फळीला प्रभावी कामगिरी न करता आल्यामुळे लंकेची 5 बाद 93 अशी स्थिती होती. पण, जेनिथ लियानगेने 22 धावा, दुनिथ वेलालगेने 18 धावा आणि महिष तिक्षणाने नाबाद 27 धावा करत संघाला विजयाकडे नेले.

मायदेशात लंकेचा पाचवा वनडे मालिकाविजय

श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्ध 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एकदिवसीय मालिका जिंकली. श्रीलंकेने याआधी 2012 मध्ये अशी कामगिरी केली होती. तसेच श्रीलंकेने न्यूझीलंडला पराभूत करत मायदेशात सलग पाचवी एकदिवसीय मालिका जिंकली. श्रीलंकेने याआधी 1997 आणि 2003 साली सलग 5-5 वेळा मालिका जिंकण्याची कामगिरी केली होती. गतवर्षी भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपनंतर श्रीलंकेने मायदेशात झिम्बाब्वे, अफगाणिस्तान, भारत, वेस्ट इंडिज व न्यूझीलंडविरुद्ध सलग वनडे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article