महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लंकेचा अफगाणवर 10 गड्यांनी विजय

06:45 AM Feb 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबो

Advertisement

सोमवारी येथे झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात यजमान लंकेने अफगाणचा 10 गड्यांनी दणदणीत पराभव केला. लंकेच्या प्रभात जयसुर्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. त्याने या सामन्यात 8 गडी बाद केले.

Advertisement

या सामन्यात अफगाणचा पहिला डाव 198 धावात आटोपल्यांनतर लंकेने पहिल्या डावात 439 धावा जमवित अफगाणवर 241 धावांची भक्कम आघाडी मिळविली. अफगाणने 1 बाद 199 या धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 296 धावात आटोपला. अफगाणच्या दुसऱ्या डावात सलामीच्या इब्राहिम झेद्रानने 12 चौकारांसह 114, नूरअली झेद्रानने 5 चौकारांसह 47, रेहमन शहाने 5 चौकारांसह 54, कर्णधार शाहिदीने 3 चौकारांसह 18, नासिर जमालने 1 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 41 धावा जमविल्या. लंकेतर्फे प्रभात जयसुर्याने 107 धावात 5, आसिता फर्नांडोने 63 धावात 3 तर रजिताने 59 धावात 2 गडी बाद केले. लंकेला निर्णायक विजयासाठी 56 धावांची गरज होती. लंकेने दुसऱ्या डावात 7.2 षटकात बिनबाद 56 धावा जमवित हा सामना 10 गड्यांनी जिंकला. करुणारत्नेने 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 32 तर मधुशेकाने 4 चौकारांसह नाबाद 22 धावा जमविल्या.

संक्षिप्त धावफलक - अफगाण प. डाव 198, लंका प. डाव सर्व बाद 439, अफगाण दु. डाव 112.3 षटकात सर्व बाद 296 (इब्राहिम झेद्रान 114, नूरअली झेद्रान 47, रेहमत शहा 54, नासिर जमाल नाबाद 41, शाहिदी 18, प्रभात जयसुर्या 5-107, रजिता 2-59, आसिता फर्नांडो 3-63).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#cricket#social media#sports
Next Article