महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लंकेचा विजयासह वनडे मालिकेत बरोबरी

06:55 AM Mar 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बांगलादेशचा 3 गड्यांनी पराभव, पी. निशांका सामनावीर, सरकार, रिदॉय यांची अर्धशतके वाया

Advertisement

वृत्तसंस्था/ चेतोग्राम

Advertisement

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत लंकेने येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात यजमान बांगलादेशचा 17 चेंडू बाकी ठेवून 3 गड्यांनी पराभव करत 1-1 अशी बरोबरी साधली. शानदार शतक झळकविणारा पी. निशांका या सामन्यात सामनावीर ठरला. तर सरकार आणि रिदॉय यांची अर्धशतके वाया गेली. या मालिकेतील बांगलादेशने पहिला सामना जिंकून आघाडी मिळविली होती. आता तिसरा आणि निर्णायक सामना महत्त्वाचा राहील.

या दुसऱ्या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशने 50 षटकात 7 बाद 286 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेने 47.1 षटकात 7 बाद 287 धावा जमवित विजय नोंदविला.

बांगलादेशच्या डावामध्ये सौम्या सरकार आणि रिदॉय यांनी शानदार अर्धशतके झळकविली. सलामीच्या दासला खाते उघडता आले नाही. सरकार आणि कर्णधार शांतो यांनी दुसऱ्या गड्यासाठी 75 धावांची भागिदारी केली. मधुशंकाने आपल्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर दासला बाद केल्यानंतर त्याने बांगलादेशला आणखी एक धक्का देताना कर्णधार देताना कर्णधार शांतोला झेलबाद केले. त्याने त्याने 39 चेंडूत 6 चौकारांसह 40 धावा जमविल्या. सरकार आणि रिदॉय यांनी तिसऱ्या गड्यासाठी 55 धावांची भागिदारी केली. हसरंगाने सरकारला झेलबाद केले. त्याने 66 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह 68 धावा जमविल्या. हसरंगाने मेहमूदुल्लाला खाते उघडण्यापूर्वी मेंडीसकरवी यष्टीचित केले. हसरंगाने यानंतर मुशफिकर रहिमला पायचित करून बांगलादेशवर दडपण आणले. बांगलादेशचा निम्मा संघ 173 धावात तंबूत परतला होता. रहिमने 3 चौकारांसह 25 धावा जमविल्या. मेहदी हसन मिराजने 1 चौकारांसह 12, शकीबने 1 चौकारांसह 18 तर तस्कीन अहमदने 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 18 धावा केल्या. रिदॉय आणि तस्कीन यांनी 8 व्या गड्यासाठी अभेद्य 50 धावांची भागिदारी केली. रिदॉयने 102 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 96 धावा झळकविल्या. बांगलादेशच्या डावामध्ये 7 षटकार आणि  27 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे हसरंगा सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने 45 धावात 4, मधुशंकाने 30 धावात 2 तर मधुशेनने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना पेथुन निशांका आणि असालेंका यांच्या दमदार फलंदाजीमुळे लंकेला हा सामना जिंकता आला. सलामीच्या निशांकाने 113 चेंडूत 3 षटकार आणि 13 चौकारांसह 114 धावा झळकविल्या. असालेंकाने 93 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह 91 धावा जमविल्या. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 147 धावांची शतकी भागिदारी केली. कर्णधार कुशल मेंडीसने 3 चौकारांसह 16, लियानगेने 9, वेलालगेने नाबाद 15 तसेच हसरंगाने 2 षटकार आणि 1 चौकारांसह 25 धावा जमविल्या. लंकेच्या डावात 9 षटकार आणि 23 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे एस. इस्लाम आणि तस्कीन अहमद यांनी प्रत्येकी 2 तर शकीब, मिराज आणि ताजुल इस्लाम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. लंकेने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 60 धावा जमविताना 3 गडी गमविले. निशांका आणि असालेंका यांनी चौथ्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी 64 चेंडूत नोंदविली. निशांकाने अर्धशतक 1 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 58 चेंडूत तर असालेंकाने अर्धशतक 50 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने झळकविले. निशांकाने शतक 3 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 100 चेंडूत झळकविले. शेवटच्या पॉवरप्ले दरम्यान लंकेने 40 धावा जमविताना 2 गडी गमविले.

संक्षिप्त धावफलक - बांगलादेश 50 षटकात 7 बाद 286 (सरकार 68, शांतो 40, रिदॉय नाबाद 96, रहीम 25, शकीब 18, टी. अहमद नाबाद 18, हसरंगा 4-45, मधुशंका 2-30, मधुशेन 1-72), लंका 47. 1 षटकात 7 बाद 287 (पी. निशांका 114, असालेंका 91, हसरंगा 25, वेलालगे नाबाद 15, कुशल मेंडीस 16, टी. अहमद 2-49, एस. इस्लाम 2-49, शकीब, मिराज, टी. इस्लाम प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article