For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

86 गावांमध्ये भुस्खलनाचा धोका

12:46 PM May 15, 2025 IST | Radhika Patil
86 गावांमध्ये भुस्खलनाचा धोका
Advertisement

कोल्हापूर / विनोद सावंत :

Advertisement

पावसाळ्यात भूस्खलनाचा धोका संभवतो अशी जिह्यात 86 ठिकाणे आहेत. मान्सूनपूर्व कामात यासाठी उपाययोजना केल्या जातात. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजनासाठी किमान 86 कोटींची आवश्यकता असून राज्यशासनाकडे तसा प्रस्ताव पाठविला आहे. परंतू वर्ष झाले तरी यासाठी निधी मिळालेला नाही.

गतवर्षीच्या  पाहणीत जिह्यात 86 गावांमध्ये भूस्खलनाचा धोका असणारी ठिकाणे आढळली आहेत. मान्सूनपूर्व कामामध्ये या ठिकाणी उपाययोजना केल्या जातात. यामध्ये जेथे धोकादायक स्थितीमध्ये काही मोठे दगड असतील, तर ते फोडून काढले जातात. गतवर्षी पावसाळ्यात भूस्खलनाच्या दोन घटना घडल्या होत्या. यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र, मालमत्तेचे नुकसान झाले. भूस्खलनाचा धोका कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासाठी 86 कोटींच्या निधीची मागणी शासनाकडे वर्षभरापूर्वी केली आहे.

Advertisement

  • जागतिक बँकेचे अर्थसहाय्य

महाराष्ट्र रिझिलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत भूस्खलन प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी जिह्यातील आठ ठिकाणे निश्चित केली असून त्यासाठी निधीची उपलब्धता करून दिली जाणार आहे.

  • भूस्खलन रोखण्यासाठी काय केले पाहिजे

-पावसाचे पाणी मुरवण्यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजना राबवाव्यात

- डोंगर उतारावर सपाटीकरण करून शेती करू नये.

- डोंगर उतारावर घनदाट वृक्षारोपण करावे.

-गवतासाठी डोंगर उतारावर किंवा पठारांवर वणवे लावू नयेत

  • धोकादायक गावांची संख्या

शाहूवाडी 19
पन्हाळा 9
भुदरगड 10
करवीर 4
गडहिंग्लज 1
राधानगरी 30
कागल 3
हातकणंगले 1
आजरा 4
चंदगड 1
गगनबावडा 4

एकूण 86

जिल्ह्यात 86 गावांमध्ये भुस्खलन होत असून तेथील तहसीलदारांना संबंधित ठिकाणी भेटी देण्यास सांगितले आहे. तसेच नागरिकांची जनजागृत्ती करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीना केल्या आहेत. पाऊस सुरू होण्यापूर्वी त्यांचे कोणत्या ठिकाणी स्थलांतर करायचे याचे तालुकानिहाय नियोजन केले जात आहे.

                                                                                                    अमोल येडगे, जिल्हाधिकारी

  • प्रत्यक्षात 10 ते 15 गावांमध्येच धोका

जिल्ह्यात 86 गावे भुस्खलन होत असले तरी 10 ते 15 गावांमध्ये लोकवस्ती आहे. तेथील लोकांना नोटीस देणे, पावसामध्ये स्थलांतर करण्याची प्रक्रिया दरवेळी पावसाळ्यात केली जाते. येथे प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी 86 कोटींचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविला आहे. याचबरोबर वर्ल्ड बँकेकडून 8 गावातील भुस्खलनावर सौम्यीकरण करण्यात येणार आहे.

                                                                प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आधिकारी

  • राधानगरीमध्ये सर्वाधिक धोका

राधानगरी तालुक्यात सर्वाधिक 30 गावांमध्ये भुस्खलनाचा धोका आहे. या खालोखाल शाहुवाडी 19 आणि भुदरगड तालुक्यात 10 गावांचा समावेश आहे. गडहिंग्लज, हातकणंगले आणि चंदगडमध्ये प्रत्येकी 1 गावात धोकादायक स्थिती आहे.

Advertisement
Tags :

.