सज्जनगड रस्त्यावर दरड पडली
सातारा :
रविवारी सातारा तालुक्यातील सज्जनगड येथे मोठया प्रमाणावर पर्यटक, भक्तगण जात असतात. सकाळपासूनच गडाकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सज्जनगड रस्त्यावर दगडधोंडे खाली आल्याची बाब काहींच्या निदर्शनास आली. त्यांनी त्याबाबतची माहिती मीडियाच्या प्रतिनिधींना दिली. त्यामुळे लगेच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून दखल घेवून ती दरड अवघ्या दोन तासात दुर करण्यात आली. रस्ता खुला करण्यात आला.
सातारा तालुक्यात सज्जनगड या ठिकाणी रविवारी सकाळपासून भाविक, पर्यटक यांची गर्दी होत असते. सकाळीच सज्जनगडकडे जाणाऱ्या भाविकांना रस्त्यावर राडारोडा आल्याची बाब निदर्शनास आली. त्यांनी लगेच त्याबाबतची माहिती मीडियाच्या प्रतिनिधींना दिली. त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनास कळवले. जिल्हा परिषदेचे अभियंता मोहसिन मोदी, सातारा पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे अभियंता माधव पाटील यांनी सुचना देवून दरड हटवण्याचे काम केवळ दोन तासात दुर केले. वाहतूक पूर्ववत केली. तसेच सातारा ते ठोसेघर या रस्त्यावरही कुठेही अडथळा निर्माण होवू नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. त्याही रस्त्यावर एक झाड पडले होते. ते हटवण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत खैरमोडे यांनी रविवारी दिली.