महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कारवार जिल्ह्यात दरडी कोसळण्याच्या घटना

10:24 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कारवार : जोरदार वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्याच्या किनारपट्टीला बसला आहे. समुद्र झीज, दरडी कोसळणे, वृक्ष उन्मळून पडणे, विजेचे खांब कोसळणे यासारख्या घटना ठिकठिकाणी घडल्या आहेत. येथून जवळच देवबाग बीचवर समुद्र झीजमुळे गंभीर स्वरूप धारण केले आहे. देवबाग बीचवर जंगल रिसॉर्टच्या मालकीच्या पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या कॉटेजीस आहेत. या कॉटेजीस पैकी चार कॉटेजीस अरबी समुद्राने गीळंकृत केल्या आहेत. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची आर्थिक हानी झाली आहे. याशिवाय सुप्रसिद्ध देवबाग बीचवरील शेकडो झाडे समुद्राच्या लाटांनी गीळंकृत केल्या आहेत. देवबाग बीच शिवाय अन्य ठिकाणीही समुद्र झीजची परिस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे किनाऱ्यालगतच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. होन्नावर तालुक्यात दमदार पाऊस होत असल्याने गीरसप्पाजवळ भास्केरी येथे दरड कोसळली आहे. ही घटना बुधवारी रात्री 9 वाजता घडली आहे. दरड कोसळल्याने होन्नावर गीरसप्पा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिकांनी मातीचे ढिगारे बाजूला सारून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी जेसीबीच्या मदतीने रस्त्यावर पडलेली माती हटविण्यात आली.

Advertisement

शिरसीत घरावर झाड कोसळले 

Advertisement

शिरसी येथील टिपूनगरात घरावर झाड कोसळले. त्यामुळे मोटारसायकल व आठ विद्युत खांबांची हानी झाली आहे. घरावर झाड कोसळल्याने लाखो रुपयांची हानी झाली आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने कोसळलेले झाड हटविले.

भटकळ तालुक्यात चोवीस तासात 123 मि.मी.पाऊस 

बुधवारी सकाळी साडे आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकूण 516 मि.मी ची तर सरासरी 43.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. भटकळ तालुक्यात सर्वाधिक 123 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी पावसाची नोंद हल्याळ तालुक्यात (6.1 मि. मी) झाली आहे. अन्य तालुक्यात झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे... अंकोला 50, होन्नावर 122.5, कारवार  33.2, कुमठा 66.6, मुंदगोड 11.4, सिद्धापूर 55, शिरसी 42, सुपा 25, यल्लापूर 25.2 आणि दांडेली 10.4.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article