चीनमध्ये भूस्खलन, 16 जण बेपत्ता
06:46 AM Jul 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बीजिंग
Advertisement
चीनच्या गांसू प्रांतातील पर्वतीय भागात मंगळवारी झालेल्या भूस्खलनानंतर 33 जण ढिगाऱ्याखाली अडकून पडले. आतापर्यंत यातील 17 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे, तर 16 जण अद्याप बेपत्ता आहेत. मदत अन् बचाव अभियान जारी ठेवण्यात आले आहे. तर हुबेई प्रांतात आलेल्या वादळामुळे कमीतकमी 8 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 275 जण जखमी झाले आहेत. चीनच्या हवामान विभागाने सुपर टायफूर ‘बावी’वरून देखील अलर्ट जारी केला आहे. हे वादळ 290 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाच्या वाऱ्यांसह प्रशांत महासागरामधून तैवानच्या दिशेने सरकत आहे. यामुळे अधिकाऱ्यांनी लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
Advertisement
Advertisement