महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

त्रिपुरामध्ये भूस्खलन-पुरामुळे हानी

07:00 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/अगरतळा

Advertisement

त्रिपुरामध्ये अतिवृष्टीमुळे आलेला पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार उडाला आहे. राज्यात आतापर्यंत 10 जणांना जीव गमवावा लागला असून एक युवक बेपत्ता झाला आहे. तर दुसरीकडे बचावमोहीम हाती घेण्यात आली असून आतापर्यंत 32,750 जणांना मदतशिबिरांमध्ये हलविण्यात आले आहे. एनडीआरएफची 4 पथके बचावकार्यात राज्याच्या पथकांना सहकार्य करत आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधत शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. रविवारपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील सर्व मोठ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे अनेक भागांमध्ये पूर आला आहे. सुमारे 1900 ठिकाणी भूस्खलन झाल्याने वाहतूक प्रभावित झाली आहे.

Advertisement

ठिकठिकाणी पाणी साचल्याने लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राज्य सरकारने पश्चिम त्रिपुरा आणि सिपाहीजला जिल्ह्यात अतिवृष्टी पाहता रेड अलर्ट जारी केला आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ, आसाम रायफल्स समवेत निमलष्करी दलांनी प्रभावित क्षेत्रांमध्ये बचाव अन् मदतकार्यात भाग घेतला आहे. सरकारने अतिवृष्टी पाहता लोकांना खबरदारी बाळगण्याची सूचना केली आहे. राज्यात आलेला पूर अत्यंत भीषण आहे. आम्ही स्थितीवर नजर ठेवून आहोत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रभावित लोकांना शक्य ती मदत उपलब्ध करण्याचा निर्देश देण्यात आला आहे. केंद्र सरकारने मदतकार्यासाठी एनडीआरएफची अतिरिक्त चार पथके पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री माणिक साहा यांनी दिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article