For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गरुडपाळ्या येथील जमीन वडिलोपार्जित

10:52 AM Dec 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
गरुडपाळ्या येथील जमीन वडिलोपार्जित
Advertisement

जमीन हडपल्याचा आरोप खोटा : महसूलमंत्री कृष्णभैरेगौडा यांचे स्पष्टीकरण

Advertisement

बेळगाव : कोलार जिल्ह्यातील गरुडपाळ्या येथे सरकारी जमीन हडपल्याचा आरोप खोटा असून ही मालमत्ता आमच्या पूर्वजांनी खरेदी केलेली आहे. याविषयी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करून सभाध्यक्षांनी हवे तर चौकशीचे आदेश द्यावे, अशी मागणी महसूलमंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. महसूलमंत्री म्हणून काही वेळा आपण घेतलेल्या परखड भूमिकेमुळे आपल्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत. सरकारी जमीन हडप केल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे स्वयंप्रेरणेने सभागृहात निवेदन करणार असल्याचे त्यांनी सांगताच भाजप आमदार सुनीलकुमार यांनी या विषयावर चर्चेला संधी देणार का? असा प्रश्न उपस्थित केला. सार्वजनिक जीवनात असताना आमची कामे काहींना आवडतात, काहींना आवडत नाहीत.

ज्यांना आवडत नाही ते आरोप करताना दिसतात. वस्तुस्थिती काय आहे, हे समजून घेतल्यावरच सत्य समजते. गरुडपाळ्या येथे म्हैसूरच्या महाराजांची अॅग्रीकल्चर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही संस्था होती. माझे आजोबा चौडेगौडा यांनी 1953 मध्ये संपूर्ण गावच लिजवर घेतले होते. श्रीकंठदत्त नरसिंहराज वडेयर ट्रस्टची जमीन लिज संपण्याआधीच महाराजांनी हबीबुल्ला खान यांना विक्री केली. आपल्या आजोबांनी म्हैसूर येथील विशेष जिल्हाधिकाऱ्यांकडे खटला दाखल केला. ट्रिब्युनलमध्ये समेट घडवण्याचा निकाल झाला. 256 एकर जमीन आजोबांना विकण्यात आली. आता हीच जमीन आपण बळकावल्याचा आरोप केला जात आहे. एक इंचही जमीन हडप केल्याचे आढळले तरी सरकारने ती ताब्यात घ्यावी, असे आव्हान मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी दिले. तसेच सभाध्यक्षांनी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करून यासंबंधी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.