Maharashtra crime | जमिनीचा वाद विकोपाला! वाईमध्ये पोटच्या भावानेच वहिनीवर केला धारदार शस्त्राने हल्ला; परिसरात खळबळ
वाईत जमिनीच्या वादातून वहिनीचा खून;
वाई - जमिनीच्या वादातून वहिनीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना नागेवाडी ता. वाई येथे घडली. आरोपी दिरास बाई पोलिसांनी ताब्यात घेतले भावाने आहे. गीताबाई चंद्रकांत यादव (रा. नागेवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पती चंद्रकांत विठ्ठल यादव (वय ५०, रा. नागेवाडी) यांनी बाई पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत, मोठा भाऊ भिकू विठ्ठलयादव (वय ५५, रा. नागेवाडी) याने माझी पत्नी गीताबाई चंद्रकांत यादव हिचा खून केल्याचे म्हटले आहे. घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडिलोपार्जित शेतीजमिनीच्या विक्रीवरून कुटुंबात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. आरोपी भिकू यादव हा वारंवार जमीन विकून टाकण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र, फिर्यादी व त्यांच्या पत्नीने जमीन विकण्यास साफ नकार दिल्याने आरोपी संतप्त झाला होता.
२८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्यासुमारास आरोपी पुन्हा घरात आला. त्या वेळी फिर्यादी शेतीच्या कामासाठी बाहेर पडत असताना त्यांना पत्नीच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी शेजाऱ्यांसह घरात धाव घेतली असता गीताबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. आरोपी भिकू यादव हा धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करत असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी पाहिले. उपस्थितांना पाहताच आरोपी घटनास्थळावरून फरारझाला.
घटनास्थळी गीताबाई यांच्या शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्या असून त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी गावचे पोलीस पाटील दीपक बनसोडे यांना माहिती देण्यात आली असून बाई पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खुनाच्या गुन्ह्यांतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून या घटनेमुळे वाई तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नातेवाईकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.