कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भूविकासकाची 36 लाखांची फसवणूक

04:29 PM Mar 06, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सांगली : 

Advertisement

शहरातील टिंबर एरियामधील अशोक चंद्राप्पा मासाळे यांची दोघांनी जमीन विकसन करण्यासाठी देतो असे सांगून 36 लाख 60 हजाराची फसवणूक केली आहे. याप्रकरणी इब्राहिम महंमदसाब नाईकवडी-इनामदार, जास्मिन इब्राहिम नाईकवडी-इनामदार रा. दोघेही गुरूवारपेठ, छळवादी गल्ली मिरज याच्याविरूध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी अशोक मासाळे यांची श्री डेव्हलपर्स अँड कंन्सलटंट नावाची फर्म आहे. या माध्यमातून ते भूविकसनचे काम करतात. संशयित दोघांची मिरज येथील समतानगरमध्ये जमीन आहे. ही जमीन विकसित करण्यासाठी त्यांनी फिर्यादी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी ही जमीन विकसित करण्यास देण्याचे खोटे आश्वासन दिले त्यानंतर त्याबाबत करारपत्र तयार केले. हे करारपत्र झाल्यानंतर 36 लाख 60 हजार रूपये रक्कम धनादेशने घेतली आहे.

त्यानंतर याबाबत माहिती घेण्यासाठी फिर्यादी मासाळे यांचे मित्र नेमगोंडा पाटील आणि किरण आडमुठे संशयितांच्या घरी गेले असता त्यांनी फिर्यादी यांना आमची केस मिटल्यानंतर इतर व्यक्तींना जमीन विकून आम्ही आपले पैसे देणार. तसेच आपण आमच्या विरोधात तक्रार दिल्यास आम्ही तुमच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करू. जर तुम्ही जमिनीच्या व्यवहाराबाबत पुन्हा फोन केला तर तुम्हाला इतका त्रास देईन की तुमची अवस्था दयनीय होईल, अशी धमकी दिली. त्यानंतर याबाबत मासाळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याच तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article