For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ललिता ज्वेलरीचा समभाग दमदारपणे सुचीबद्ध`

06:32 AM Aug 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
ललिता ज्वेलरीचा समभाग दमदारपणे सुचीबद्ध
Advertisement

शेअरबाजारात सुरेख सुरुवात : आयपीओला होता चांगला प्रतिसाद

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

ज्वेलरीसंबंधीत रिटेल कंपनी ललिता ज्वेलरी मार्ट लिमिटेड यांचा समभाग शेअरबाजारात सोमवारी दमदारपणे सुचीबद्ध झालेला दिसून आला. 201 रुपयांच्या इशु किमतीच्या तुलनेत समभाग बाजारात 265 रुपयांवर सुचीबद्ध झाला होता. याप्रमाणे पाहता गुंतवणूकदारांना प्रति समभागांमागे 64 रुपयांचा लाभ झाल्याचे समोर आले आहे.

Advertisement

बीएसईवर समभाग 265 रुपयांवर सुचीबद्ध झाला होता. याआधी कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. जो शेवटच्या दिवशी 62.97 पट भरुन बंद झाला. ललिता ज्वेलरीचा एक लॉट खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांना जवळपास 4736 रुपयांचा लाभ झाल्याची माहिती आहे.

एका लॉटमध्ये 74 समभागांचा समावेश होता. 64 रुपये प्रत्येक समभागामागे लाभ गुंतवणूकदारांना झालेला आहे. आयपीओ 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान गुंतवणूकीसाठी खुला झाला होता. 1700 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना असून 1200 कोटींचे ताजे समभाग सादर केले जाणार आहेत.

कंपनीची ओळख

ललिता ज्वेलरी मार्टची स्थापना नोव्हेंबर 1985 मध्ये झाली. दक्षिण भारतात  कंपनी ज्वेलरीसंबंधीत रिटेल व्यवसाय करते. किमत व मूल्य यावर लक्ष ठेऊन दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आकर्षून घेण्यावर कंपनी भर देते. सोने, चांदी, हिरे व किमती खडे यांच्यापासून कंपनी दागिने बनवते. दक्षिणेत छोट्या व मध्यम शहरांमध्ये यांचा व्यवसाय बऱ्यापैकी कार्यरत आहे. 31 मार्च 206 पर्यंत कंपनीकडे कर्मचाऱ्यांची संख्या 7059 इतकी होती.

Advertisement

.