For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

लक्ष्य सेनची कोरिया स्पर्धेतून माघार

06:50 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
लक्ष्य सेनची कोरिया स्पर्धेतून माघार
Advertisement

वृत्तसंस्था, बर्लिन

Advertisement

भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने 3 ते 8 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या कोरिया खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. लक्ष्य सेनने हायलो बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचे जेतेपद रविवारी मिळविले होते.

या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या जपान मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनचे पुनरागमन अपेक्षित आहे. हायलो बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनने अंतिम सामन्यात जोनाथन ख्रिस्टीचा 6-1, 6-4 असा पराभव करून 2026 च्या बॅडमिंटन हंगामातील पहिले विजेतेपद मिळविले होते. हायलो बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूने महिला एकेरीचे विजेतेपद मिळविले. तसेच सिंधूनेही कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांना कळविला आहे. ती आता जपान मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे. आता कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनच्या गैरहजेरीत भारताचा एचएस प्रणॉय याचा सलामीचा सामना दक्षिण कोरियाच्या बिन बरोबर होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.