महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लक्ष्य सेन, सिंधू यांना विदेशात प्रशिक्षण

06:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांना क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक सेलने (एमओसी) विदेशात खास प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला असून या प्रशिक्षणासाठी होणाऱ्या आर्थिक खर्चाला क्रीडामंत्रालयाकडून अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. लक्ष्य सेनला फ्रान्समध्ये तर पीव्ही सिंधूला जर्मनीमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार आहे. फ्रान्समधील मार्सेली येथे सेनसाठी 12 दिवसांचे खास प्रशिक्षण शिबिर घेतले जाणार असून या शिबिरात त्याला अव्वल प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर शिबिर लक्ष्य सेनच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे राहिल. सेनच्या या प्रशिक्षण सरावाला 8 जुलैपासून प्रारंभ होणार आहे. भारताची महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिला जर्मनीत प्रशिक्षण आयोजित केले आहे. आगामी पॅरिस ऑलिम्पिसाठी भारताच्या विविध क्रीडापटूंना विदेशात सरावाकरिता पाठविले जाणार असून केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून सर्व आर्थिक खर्च केला जाणार आहे. भारताचा टेबल टेनिसपटू हर्मित देसाई, महिला मल्ल निशा आणि रितिका त्याचप्रमाणे भारताच्या महिला रिले संघातील धावपटूंनाही सरावासाठी विदेशात पाठविले जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article