For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लक्ष्य सेन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याच्या मार्गावर

06:34 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
लक्ष्य सेन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याच्या मार्गावर
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राष्ट्रकुल खेळांतील विजेत्या लक्ष्य सेनच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्याच्या आशांना बळ मिळाले आहे. कारण त्याने गेल्या आठवड्यात फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळवल्यानंतर ऑलिम्पिक खेळांच्या ताज्या पात्रता क्रमवारीत त्याला 15 वे स्थान मिळाले आहे.

अल्मोडा येथील 22 वर्षीय सेन नोव्हेंबर, 2022 मध्ये कारकिर्दीतील सर्वोच्च म्हणजे जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला होता. परंतु गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्याची जागतिक क्रमवारीत 25 व्या क्रमांकापर्यंत घसरण झाली होती. ऑगस्टपर्यंत तो 11 व्या स्थानावर आला होता, परंतु या वर्षाच्या सुऊवातीला तो परत घसरून 20 व्या स्थानावर पोहोचला होता.

Advertisement

मलेशिया सुपर 1000 आणि इंडिया सुपर 750 मधील पहिल्या फेरीतील पराभवानंतर त्याच्यासाठी परिस्थिती चांगली दिसत नव्हती. कारण तो ऑलिम्पिक खेळांच्या पात्रता क्रमवारीत काही आठवडे 19 व्या स्थानावर राहिला होता. परंतु गेल्या आठवड्यात फ्रान्सच्या राजधानीत झालेल्या सुपर 750 स्पर्धेत उपांत्य फेरी गाठून त्याने आपली गुणसंख्या 74,897 वर नेली आहे. 2021 सालच्या जागतिक स्पर्धेतील या कांस्यपदक विजेत्याने मंगळवारी जाहीर झालेल्या जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या जागतिक क्रमवारीतही 18 व्या स्थानावर झेप घेतली आहे.

तथापि, 2023 च्या जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता एच. एस. प्रणॉय जागतिक क्रमवारीत आणि ऑलिम्पिक पात्रता क्रमवारीतही आठव्या स्थानावर घसरला आहे. गेल्या आठवड्यात पहिल्या फेरीत पराभूत झाल्यामुळे त्याच्यावर हा प्रसंग ओढवला आहे. मात्र ऑलिम्पिक पात्रतेसाठीच्या शर्यतीत तो अजूनही अव्वल क्रमांकाचा भारतीय एकेरी खेळाडू आहे. किदाम्बी श्रीकांत 26 व्या क्रमांकावर. पी. व्ही. सिंधू ऑलिम्पिक पात्रता क्रमवारीत 13 व्या क्रमांकावर, तर अश्विनी पोनप्पा आणि तनीषा जॉली ही जोडी 20 व्या स्थानावर आहे. सात्विकसाईराज रान्कीरे•ाr आणि चिराग शेट्टी हे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर, परंतु ऑलिम्पिक खेळांच्या पात्रता क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहेत.

Advertisement
Tags :

.