शहापूर परिसरात आज लक्ष्मीपूजन
बेळगाव : त्रिपुरारी पौर्णिमेला मंगळवारी रात्री 10.36 नंतर सुऊवात झाली असून बुधवारी (दि. 5) सायंकाळी 6.49 पर्यंत पौर्णिमेचा कार्यकाल असेल. अनेकजण त्रिपुरारी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला घरे, आस्थापनांतून लक्ष्मीपूजन करतात. शहापूर परिसरात बुधवारी लक्ष्मीपूजन होणार आहे. अश्विन अमावास्या किंवा बलिप्रतिपदेला लक्ष्मी-कुबेर पूजन शक्य न झालेले बुधवारी लक्ष्मीपूजन करू शकतात. तुळशी विवाहासाठीही बुधवारी अखेरचा मुहूर्त आहे. यंदा कार्तिक शुक्ल द्वादशी रविवार दि. 2 पासून तुळशी विवाहाला सुऊवात झाली होती.
कार्तिक पौर्णिमेला अनेक ठिकाणी दीपोत्सव होतो. त्रिपूर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाची आराधना करून त्याला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मदेवाकडून त्याने अमरत्व प्राप्त करून घेतले. ते प्राप्त झाल्यानंतर त्रिपूर राक्षसाने देव-देवतांना सतावून सोडले. श्रीविष्णुनांही त्रिपुराचा प्रतिकार करणे शक्य झाले नाही. अखेरीस भगवान शंकरानी तीन दिवस युद्ध करून कार्तिक पौर्णिमेला त्रिपुराचा वध केला. देव-देवतांना आनंद झाला. त्यांनी शंकराची प्रशंसा करीत दीपोत्सव साजरा केला. तेव्हापासून दीपोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. दगडी मोठ्या खांबावर ]िदवे लावण्याची व्यवस्था केलेली असते. तेथे दिवे लावले जातात. या खांबाला त्रिपुर असे म्हटले जाते.