मंडोळीतील मंदिर बांधकामाची लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी
09:33 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील मंडोळी येथे सुमारे दोन कोटी रुपये खर्चातून हनुमान, विठ्ठल-रखुमाई व कलमेश्वर मंदिराचे बांधकाम करण्यात येत आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बांधकाम स्थळाला नुकतीच भेट देऊन पाहणी केली. तसेच स्थानिक नागरिक व संबंधितांकडून बांधकामाबाबतची माहिती घेतली. बांधकाम दर्जेदार व्हावे, इमारतीसाठी वापरण्यात येणारी सामग्री दर्जेदार असावी मंदिराच्या परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना संबंधितांना केल्या. बांधकाम वेळेत पूर्ण करण्याकडेही लक्ष द्यावे. परिसरात स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज यासारख्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी सूचनाही केली. यावेळी मंदिर विकास समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
Advertisement
Advertisement