For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लक्ष्मी डेंटलचा समभाग दमदारपणे लिस्ट

08:46 PM Jan 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
लक्ष्मी डेंटलचा समभाग दमदारपणे लिस्ट
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

सोमवारी शेअर बाजारात लक्ष्मी डेंटलचे समभाग दमदारपणे सूचिबद्ध झाले. 23 टक्के  प्रीमीयमसह समभाग बीएसईवर 528 वर तर एनएसईवर 542 रुपयांवर सूचिबद्ध झाला. आयपीओसाठी समभागाची इश्यू किंमत 428 रुपये प्रति समभाग इतकी ठेवली होती. कंपनीचे समभाग दोन्ही निर्देशांकावर सोमवारी दणक्यात वाढीसह सुचीबद्ध झाले. एकावेळी बीएसईवर लक्ष्मी डेंटलचा समभाग 538 रुपयांवर पोहचला. गुंतवणूकदारांना जवळपास 25 टक्के इतका परतावा मिळाला आहे.

147 पट आयपीओ सबस्क्राइब

Advertisement

हा आयपीओ 114 पर सबस्क्राईब झाला होता. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 147 पट व पात्रताधारक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 110 पट आयपीओ सबस्क्राईब केला आहे. रिटेल गुंतवणूकदारांनी 74 पट आयपीओ सबस्क्राईब केला आहे. 13 ते 15 जानेवारी दरम्यान आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होता. 407 ते 428 रुपये प्रति समभाग अशी किंमत निश्चित केली होती. 138 कोटीचे नवे समभाग कंपनीने सादर केले होते. ऑफर फॉर सेलअंतर्गत 1.38 कोटीचे समभाग विक्रीसाठी ठेवले होते.

विप्रोचे समभाग 8 टक्के वधारले

याच दरम्यान आयटी दिग्गज कंपनी विप्रोचे समभाग तिमाही निकालाच्या उत्साहात 8 टक्के इतके सोमवारी वधारले होते.  तिसऱ्या तिमाहीचा नफा कंपनीने जाहीर केला असून नफा 24 टक्के वाढला आहे. कंपनीने डिसेंबरअखेरच्या तिमाहीत 24 टक्के वाढीसह 3353 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. 22318 कोटी रुपये इतका एकत्रित महसुल कंपनीने या अवधीत प्राप्त केला. या समभागात यापुढेही गुंतवणूक सुरु ठेवण्याचा सल्ला ब्रोकर्सकडून देण्यात आला आहे. वर्षभरात विप्रोने गुंतवणुकदारांना 26 टक्के परतावा दिला आहे. नुवामाने 350 रुपयांचे टार्गेट दिले आहे. मोतीलाल ओसवालने 290 रुपयांचे टार्गेट दिले आहे.

इन्फोसिसचा नफा 6,806 कोटीवर

ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत इन्फोसिसचा नफा 6,806 कोटी रुपयांवर राहिला आहे. यामध्ये  कंपनीचा महसूल 7.6 टक्क्यांनी मजबूत होत तो  41,764 कोटी रुपयांवर पोहोचला असल्याची माहिती आहे.

Advertisement
Tags :

.