शशांक केतकरच्या घरी आली लक्ष्मी
04:00 PM Jan 23, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement
मुंबई
मराठी अभिनेता शशांक केतकरने एक गुड न्यूज सोशल मिडीयावरून त्यांच्या चाहत्यांना दिली. शशांकच्या घरी नुकतीच लक्ष्मी आली आहे. म्हणजे शशांक केतकर दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याला मुलगी झाली आहे.
शशांकने आता खऱ्या अर्थाने कुटुंब पुर्ण झालं. घरात लक्ष्मी आली आहे, राधा. असा ऑडीओ बॅकग्राऊंडला देऊन ही बातमी सर्वांसोबत शेअर केली. नववर्षाच्या सुरुवातीलाच शशांक ने पत्नी प्रियंकाचे मॅटर्निटी फोटोशुट त्याच्या सोशल मिडीयावर शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. तर हम दो हमारे दो म्हणत मुलीच्या आगमनाने कुटुंब पुर्ण झाल्याचा आनंद त्याने व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्याच्या हात त्याच्या पत्नीचा हात मग त्याच्या मुलाचा हात आणि शेवटी त्याची मुलगी राधा चा हात असा व्हीडीओ आहे.
Advertisement
Advertisement