लेडीबगला मानले जाते गुडलक
एका देशात मात्र यावर अजब गोष्ट
भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये काही पक्ष्यांना पाहणे शुभ मानले जाते, तर काही प्राण्यांना पाहणे अशुभ मानले जाते. परंतु जगात एका किड्यावरून अजब प्रकारची मान्यता आहे. युरोप आणि अमेरिका दोन्ही ठिकाणी याला चांगल्या नशिबाचा संकेत मानले जाते. परंतु स्वीत्झर्लंडमध्ये याला एका अजब प्रश्नाच्या उत्तरात सामील केले जाते. लहान मुले जेव्हा आईला स्वत:च्या जन्माबद्दल विचारतात, तेव्हा त्याला या लेडीबगशी जोडले जाते.
युरोप आणि अमेरिका दोन्ही ठिकाणी लेडीबगला पाहणे सुदैवाचा संकेत मानले जाते. लेडीबग पाहिल्यावर शांतता स्वीकारा, प्रक्रियेवर विश्वास करा आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अनांद शोधण्याचे स्मरण होत. लेडीबग तेथे आशेचा संकेत असल्याचे तेथील अध्यात्मिक गुरु जोना जोन्स यांचे सांगणे आहे.
या लाल चमकणाऱ्या रंगाच्या किड्याला सर्वसामान्य किड्याप्रमाणे पाहिले जात नाही. तसेही हा हिवाळ्यात दिसून येणारा किडा असून तो माणसांना चावूही शकतो. तरीही वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये लेडीबग पाहण्याचे अनेक अर्थ काढले जातात. युरोपमध्ये लेडीबग पाहणे म्हणजेच संपत्तीला आकर्षित करण्याचा संकेत असतो. तसेच तो दिसल्यास वाईट नशीब दूर होते असे मानले जाते.
अमेरिकेत लेडीबग पाहणे चांगला संकेत आहे. तेथील संस्कृतीत लेडीबग पुनर्जागरण आणि सकारात्मक बदलाचा संकेत आहे. अवघड काळात तो पाहणे एक चांगला इशारा असतो. लेडीबग स्वत:च्या हातात पकडून सोडल्यावर तो ज्या दिशेने उडतो, त्या दिशेला संबंधिताचा गुडलक असतो असे अनेक ठिकाणी मानले जाते.
जगात अनेक ठिकाणी छोट्या मुलांच्या काही प्रश्नांना टाळले जाते. यातील सर्वात सामान्य प्रश्न मुले आईवडिलांना आम्ही कुठून आलो असा विचारत असतात. काही आईवडिल एक परी मुलांना सोडून गेल्याचे उत्तर देतात. तर स्वीत्झर्लंडमध्ये या प्रश्नाच्या उत्तरादाखल लेडीबगकडून मुले मिळाल्याचे आईवडिल सांगत असतात.