For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लेडी गागा पुन्हा रिलेशनशिपमध्ये

06:05 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
लेडी गागा पुन्हा रिलेशनशिपमध्ये
Advertisement

तिसऱ्यांदा एंगेजमेंट केल्याची चर्चा

Advertisement

प्रसिद्ध अमेरिकन गायिका लेडी गागा स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यामुळे जगभरात चर्चेत असते. ती कुणाला डेट करतेय, तिचा सध्याचा बॉयफ्रेंड कोण आहे यावर सर्व चाहत्यांच्या नजरा लागून असतात. लेडी गागा लवकरच व्हाइट गाउन परिधान करत प्रियकर मायकल पोलांस्कीसोबत विवाहबद्ध होणार आहे. लेडी गागाचे एंगेजमेंट रिंग परिधान केलेले एक छायाचित्र सध्या व्हायरल होत आहे.

लेडी गागा सध्या उद्योजक मायकल पोलांस्कीला डेट करत आहे, तिच्या या नात्याला वर्ष झाले आहे. आता या दोघांनी एंगेजमेंट केल्याचे वृत्त आहे. लेडी गागाने यापूर्वी दोनवेळा एंगेजमेंट केली होती. तिच्या नव्या छायाचित्रात दिसून आलेल्या मोठ्या डायमंड रिंगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. परंतु लेडी गागा आणि मायकल पोलांस्कीकडून यासंबंधी अधिकृत घेषणा करण्यात आलेली नाही.

Advertisement

लेडी गागाने यापूर्वी ‘ब्लडी मेरी’चा गायक टेलर किन्नीसोबत एंगेजमेंट केली होती. टेलरपूर्वी तिने क्रिस्तियन करिनोसोबत एंगेजमेंट केली होती.  परंतु या दोघांसोबतचे तिचे नाते फारकाळ टिकू शकले नव्हते.

38 वर्षीय लेडी गागा आणि 46 वर्षीय मायकल पोलांस्की हे वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही आता विवाहबद्ध होणार की नाही याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Advertisement
Tags :

.