एक लाख 80 हजार लाडूंचे भाविकांना होणार वितरण ! अंबाबाई नवरात्रोत्सव तयारी
कळंबा कारागृहाला देवस्थान समितीकडून लाडूचे कंत्राट : शेतकरी संघ कार्यालयाजवळून दर्शन मंडप उभारणीला सुऊवात, 116 सीसीटीव्ही व 1 ड्रोन कॅमेऱ्याचा मंदिर व परिसरावर असणार वॉच
कोल्हापूर प्रतिनिधी
जोरदार पावसाच्या माऱ्यातही करवीरनगरीत शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी जोरा त सुऊ आहे. देवदेवतांच्या मंदिरांच्या स्वच्छतेसह रंगरंगोटीच्या कामालाही सुऊवात झाली आहे. मंदिर व्यवस्थापनांसह भाविक या कामात आपली सेवा देऊन लागले आहेत. मंदिरांमध्ये देवदेवतांची गाणीही वाजू लागली आहेत. या गाण्यांनी मंदिर व परिसरात नवरात्रोत्सव अन् प्रसन्नतेची छटा उमटू लागली आहे. बाजारपेठेत घटस्थापनेसाठी लागणाऱ्या काळ्या मातीसह विविध प्रकारांच्या विधी साहित्यांची आवक झाली आहे. अनेक विक्रेत्यांनी विधी साहित्यांचा पुरवठा करणारे स्टॉल बाजारपेठेत लावले आहेत.
दुसरीकडे अंबाबाई मंदिरात सुऊ असलेली नवरात्रोत्सवाची तयारी जोर धरू लागली आहे. उत्सव काळात भाविकांना वितरीत करण्यासाठी कळंबा कारागृहातील बेकरी विभागातील 1 लाख 80 हजार बुंदी लाडू प्रसादाचे कंत्राट दिले आहे. भाविकांना दहा ऊपयाला 1 याप्रमाणे विक्री केल्या जाणाऱ्या लाडूमधून देवस्थान समितीला उत्सव काळात अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. अन्न औषध प्रशासनाकडून लाडूचे टेस्टिंग कऊन ते मंदिरात आणले जातील, असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून अंबाबाई मंदिराचे मंदिरातील कंपनीकडून सुऊ असलेले स्वच्छता काम अंतिम टप्प्यात आहेत. शनिवार 28 रोजी मंदिरातील अंबाबाईच्या गाभाऱ्या स्वच्छता केला जाणार आहे. त्यामुळे सकाळी 8 ते सायंकाळी 6 यावेळेत गाभाऱ्याचा दरवाजा बंद असणार आहे. या कालावधीत देवीच्या मुळमूर्तीचे दर्शन घडणार नाही. मात्र मंदिरात विराजमान केल्या जाणाऱ्या अंबाबाईच्या उत्सवमूर्तीचे दर्शन दिले जाणार आहे.
मोठा दर्शन मंडप उभारतोय...
नवरात्रोत्सव काळात भाविकांना अंबाबाईचे दर्शन कमीत कमी वेळेत घडावे, दर्शन कार्याला शिस्त लागावी याचा अभ्यास कऊन शेतकरी संघ कार्यालयाजवळून दर्शन मंडप उभारणीला सुऊवात झाली आहे. शेतकरी संघ कार्यालयातूनच सुऊ केल्या जाणाऱ्या दर्शन रांगेतील सर्व भाविक बाहेरील दर्शन मंडपात दाखल होतील, असे नियोजन आहे. पुर्व दरवाजासह मंदिरातील व्हरांड्यात जाणाऱ्या मंडपातील भाविकांना पावसाचा त्रास होऊ नये यासाठी मंडपावर पत्रे घालण्यात येणार आहेत. या मंडपात पिण्याच्या पाण्याचीही सोय असणार आहे.
आरोग्य केंद्र सुसज्ज असणार...
देवीच्या दर्शनाच्यानिमित्ताने दर्शन रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था देखील देवस्थान समितीकडून सक्रीय ठेवण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंदिराच्या घाटी दरवाजा, नवगृहाजवळ असलेले आरोग्य तपासणी केंद्र सर्व बाजूंनी सुसज्ज ठेवले जाणार आहे. लवकरच मागील वर्षातील भाविकांना भोगाव्या लागलेल्या आरोग्याच्या तक्रारींचा आढावा घेऊन आरोग्य तपासणी केंद्रात आवश्यकती सर्व प्रकारची औषधे आणली जाणार आहेत.
गरूड मंडपाच्या जागी उभारणार आकर्षक मंडप...
अंबाबाई मंदिरालगतचा लाकडी गऊड मंडप नुकताच उतऊन घेतला आहेत. ऐन नवरात्रोत्सवाच्या तोंडावर हे काम केले असले तरीही रात्रीचा पालखी सोहळा व देवीच्या धार्मिक विधीसाठी उतऊन घेतलेल्या मंडपाच्या जागी तात्पुरत्या स्वऊपात लोखंडी मंडप उभारला जाणार आहे. त्याला आकर्षक असे ऊप आणले जाणार आहे. त्याचे छत जुन्या गऊड मंडपासारखे तयार केले जाणार आहे.
विद्यूत रोषणाईचे टेस्टिंग...
नवरात्रोत्सव काळात अंबाबाई मंदिर उजळून निघेल अशी आकर्षक विद्युत रोषणाई केली जात आहेत. या रोषणाईचे गुऊवारी सायंकाळी टेस्टिंग घेतले. तासातासाला कोसळत राहिलेल्या पावसामुळे मंदिरात दर्शनाला जात राहिलेल्या भाविकांना विद्यूत रोषणाईचा झटका बसू नये याची विशेष खबरदारी घेतली जात आहे.
आता 116 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा असणार वॉच...
पुर्वीपासूनच अंबाबाई मंदिर व परिसरावर 96 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी वॉच आहे. त्यांचा आढावा घेऊन चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी तथा देवस्थान समिती प्रशासक अमोल येडगे यांनी मंदिर व भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव विशेष सुचना दिल्या आहेत. त्यानुसार मंदिर व परिसरातील गर्दी अधिक चांगल्या पद्धतीने वॉच रहावा यासाठी जादाचे वीस कॅमेरे लावले आहेत. एका ड्रोन कॅमेऱ्यानेही मंदिरावऊन वॉच ठेवला जाणार आहे.