For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबईच्या डावात लाडचे शतक

06:21 AM Feb 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुंबईच्या डावात लाडचे शतक
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरु असलेल्या इलाईट ड गटातील सामन्यात कर्णधार सिद्धेश लाडच्या शतकामुळे मुंबईने पहिल्या डावात दिल्लीवर 96 धावांची आघाडी मिळविली. रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी दिल्लीने दुसऱ्या डावात 4 बाद 206 धावा जमवित 110 धावांची बढत घेतली आहे.

या सामन्यात दिल्लीचा पहिला डाव 221 धावांत आटोपला. दिल्लीच्या सनद सांगवानने शानदार शतक झळकाविले. तर मुंबईच्या अवस्थिने 5 आणि मुलानी व तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. मुंबईने 5 बाद 266 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे पाच फलंदाज 49 धावांत बाद झाले. कर्णधार सिद्धेश लाडने 12 चौकारांसह 103 तर सुवेध पारकरने 2 षटकार आणि 4 चौकारांसह 58, मुशिर खानने 7 चौकारांसह 57, मुलानीने 6 चौकारांसह 34 धावा जमविल्या. दिल्लीच्या मेहराने 64 धावांत 5 गडी बाद केले. त्यानंतर दिल्लीने दुसऱ्या डावात 51 षटकात 4 बाद 206 धावा जमविल्या. वैभव कांडपालने 7 चौकारांसह 61 धावा झळकाविल्या. कर्णधार आयुष डोसेजा 6 चौकारांसह 62 धावांवर खेळत आहे. मुंबईतर्फे हिमांशु सिंगने 23 धावांत 2 तर तुषार देशपांडे आणि तरमले यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Advertisement

संक्षिप्त धावफलक - दिल्ली प. डाव 221, मुंबई प. डाव 317 (सिद्धेश लाड 103, पारकर 58, मुशिर खान 57, मुलानी 34, मेहरा 5-64, ग्रेवाल 3-74), दिल्ली दु. डाव 4 बाद 206 (डोसेजा खेळत आहे 62, कांडपाल 61, सांगवान 24, हिमांशु सिंग 2-23, देशपांडे व तरमले प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.