For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बहिणींनो आता सावत्र भावांना टेन्शन द्या! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

06:25 PM Aug 19, 2024 IST | Abhijeet Khandekar
बहिणींनो आता सावत्र भावांना टेन्शन द्या  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
Ladki Bahin Yojana
Advertisement

योजनेवर टीका करणाऱ्यांचा घेतला समाचार, ज्यांच्या पाठीशी ताई त्यांना कोणीही थांबवू महायुतीचेच सरकार येणार ; देवेंद्र फडणवीस यांचा दावा, गुलाबांच्या पाकळयांनी केले स्वागत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वागत

सातारा प्रतिनिधी

राज्यातल्या काही पालकांना मुलींच्या शिक्षणाची अर्धी फी भरता येत नव्हती म्हणून 100 टक्के फी माफीचा निर्णय घेतला गेला आहे. अशा अनेक योजना हे सरकार राबवत आहे. लाडकी बहिण योजनेचे पैसे येणार नाहीत म्हणून विरोधक ओरडत होते. पण आता या योजनेचे पैसे आले आहेत. म्हणून या योजनेचे नाव मुख्यमंत्र्यांची बहिण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत असे म्हणत होते. जसे पैसे आले तसे त्यांचे चेहरे पांढरे फटक पडले आहेत. भगिनींनो योजना बंद पडणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सावत्र भावांना टेन्शन द्या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ज्यांच्या पाठीशी ताई त्यांना कोणीही थांबवू शकत नाही, उद्या महायुतीचेच सरकार येणार असा दावा त्यांनी केला.

Advertisement

सैनिक स्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पालकमंत्री शंभूराज देसाई, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद आबा, आमदार दीपक चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव, जयवंत शेलार, शिंदे गटाचे सातारा शहराध्यक्ष निलेश मोरे, पिपल्स रिपल्बीकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रमेश उबाळे, जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे, विशाल भोसले, जयंत आसगावकर, आनंदराव पाटील, यशराज देसाई, अविनाश कदम, स्मिता देशमुख, फिरोज पठाण आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सातारचा आणि माझं जिव्हाळ्यांचे नातं आहे. ही माझी जन्मभूमी आहे. रक्षाबंधनचा सण उद्या आहे पण आजच बहिणींच्या मायेचा सागर आर्शिवाद द्यायला उसळला आहे. मला सख्खी बहिण एकच आहे पण आता या महाराष्ट्रातल्या कोट्यावधी बहिणी माझ्या आहेत. माझ्या ताई कष्ट करतात, त्याग करतात. तुमच्यासाठी तीन भाऊ आले आहेत. सगळ्या माता भगिनींच्या खात्यात कालच 1 कोटी महिलांच्या खात्यात 3 हजार कोटी जमा केलेत, दोन दिवसात आणखी एक कोटी महिलांच्या खात्यात जमा करतोय. पूर्ण आर्थिक वर्षात 35 हजार कोटीची तरतूद केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि मी सरकारमध्ये आल्याच्या पहिल्या दिवसापासून याचे नियोजन सुरु केले. त्यात अजितदादा आल्याने ताकद वाढली. सगळयांसाठी योजना राबवण्यासाठी प्रयत्न करुयात मी फडणवीस साहेबांना बोललो होतो. तेव्हा फडणवीस यांनी शिंदे साहेब तुम्ही योजना सूचवा आणि योजनांची अंमलबजावणी सुरु झाली. सरकार मजबूत होत आहे. काही जण सांगत होते की लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. मी देखील सामान्य कुटुंबातील आहे सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला नाही आलो. जे सोन्याचा चमचा घेवून आलेत त्यांना सामान्य मायभगिनींची दु:ख काय कळणार, असा टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

Advertisement

द्यायची दानत लागते
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, हे राज्य बलवान आहे. वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत, खंबीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेंबांच्या पाठीशी सरकार आहे. आज दीड हजार भेटत आहेत. उद्या पावणे दोन भेटतील, दोन भेटतील, तीन हजार पुढे होतील, द्यायची दानत लागते. तेवढी सरकारमध्ये शक्ती आहे. तुमचे सरकार अडीच वर्ष होते. तुम्ही का दिले नाहीत. तुमचे हात बांधले होते का, देशात काँग्रेसची सत्ता होती. काय केले काँग्रेसवाल्यांनी असा विरोधकांना सवाल करत मुख्यमंत्री म्हणाले, महिलांना आत्मनिर्भर करण्याचे काम केले जात आहे. पैसे मिळाल्याने महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. पण दुसऱ्या बाजूला काही सावत्र भावांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. चुनावी जुमला आहे असा आरोपही केला. त्यांना जोडा दाखवाल ना तुम्ही. भगिनींनो तुम्ही टेन्शन घेवू नका, त्या सावत्र भावांना टेन्शन द्या. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली होईल, हा माहेर आहेर आहे. भावाने केवळ रक्षा बंधनापुरताच आहेर दिला नाही तर पुढेही देत राहणार आहे, असा शब्द त्यांनी दिला. पुढे ते म्हणाले, आपल्या बहिणी बोलताना लाज वाटत नाही विरोधकांना, निवडणूक येतात जातात, राजकारण राजकारणाच्या जागी राहते. हा महाराष्ट्र पुरोगामी आहे. काही लोक वेड्यासारखी बडबडत होते. खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. जसे पैसे आले तसे त्यांचे चेहरे पांढरे फटक पडले, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर टीका करत लाडक्या बहिणींचे आर्शिवाद असू द्या, विरोधकांना तुम्हीच जागा दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

महिला सक्षम झाल्यास भारत सक्षम-देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज महत्वाचा दिवस आहे. आज राजधानीत 50 हजार बहिणी आल्या आहेत. ज्यांच्या मागे साई त्यांना नाही कोणाची भीती, ज्यांच्या पाठीशी ताई त्यांना कोणी काही करु शकत नाही. मायभगिनींची सेवा करण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. देशाचे पंतप्रधान यांनी सांगितले की भारताला गरिबीतून मुक्त करायचे असेल तर महिलांना सक्षम करावे लागेल, त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे. मग लेक लाडकी असेल एसटी 50 टक्के प्रवास असेल, भगिनी तुमची शक्ती बघा. नुकसान असलेली एसटी फायद्यात आली. उद्या रक्षण बंधन आहे. केवळ रक्षाबंधनापुरती ओवाळणी नाही तर ती दर महिन्याला आम्हा भावांकडून ओवाळणी येणार आहे. त्यात खंड पडणार नाही. काही सावत्र भाऊ आहेत, दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ते कोर्टात गेले. पण ज्याच्या मागे ताई, त्याला कोणी थांबवू शकत नाही. ताईंच्या खात्यात पैसे जमा केले. बजेटमध्ये पूर्ण वर्षभराची तरतूद केली आहे. काळजी करू नका, महायुतीचेच सरकार येणार आहे, असा दावा त्यांनी केला.

पुढे ते म्हणाले, साताऱ्यात पहिलं पुस्तकाचे गाव झाले, पहिले मधाचे गाव झाले. आता पहिले सौरग्राम मान्याचीवाडी होत आहे. गावाला वीज मोफत मिळणार आहे. गावाला सव्वा पाच लाख रुपये वीज बिल येत होते. आता ते शुन्यावर गेले आहे. या गावाचं अभिनंदन करावं लागेल, कुठलीही योजना असली तरीही गावाचा सहभाग असतो, अशा शब्दात त्यांनी कौतुक केले. पुढे त्यांनी एसटीमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा सुरु केल्याच्या उपक्रमाची माहिती दिली.

भगिनींसाठी आज आनंदाचा दिवस-आदिती तटकरे
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, अत्यंत भगिनींच्यासाठी हा आनंदाचा दिवसा आहे, राखी पौर्णिमा अगोदर हा ओवाळणीचा कार्यक्रम होत आहे. आपल्या भावांनी पाच दिवस अगोदरच ओवाळणी दिली आहे. साधारणपणे पहिल्या टप्यातली फॉर्म भरण्याची मुदत दि. 1 जुलै ते 31 ऑगस्ट आहे. आम्ही पहिल्या आता जे 14 तारखेपासून लाभ सुरु केलेला आहे. 1 जुलै ते 31 जुलै पर्यंत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज भरले. त्यांचे फॉर्मस साधारणपणे जुलै महिन्यातले प्राप्त झाले ते 1 कोटी 40 लक्ष पेक्षा जास्त त्यामुळे त्या फॉर्मची स्कुटणी करणे, त्या सगळ्या बाबी तपासणी करणे, नवीन अकाऊंट ओपन करणे, बऱ्याचशा तीस ते पस्तीस टक्के महिलांचे स्वतंत्र अकाऊंटच नव्हते. ते ओपन करुन घेणे सातारा जिह्यातून साधारणपणे अर्ज ऑनलाईन ते 5 लाख 21 हजार 131 आहेत. त्यापैकी 5 लाख 12 हजार 800 हे 98 अर्ज अपॅव्हु केले. जुलै आणि ऑगस्ट नोंदणी केली त्यांना वितरीत केल्याचे त्यांनी सांगितले.

पालकंमत्री शंभूराज देसाई म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी योजनेचे काम सातारा जिह्यात चांगले केले. आम्ही पहिल्या पाच दिवसात अर्ज भरून घेतले. भगिनींच्या शेतावर गेलो, बांधावर गेलो जिथं माता भगिनी काम करत होत्यां. तिथं जाऊन अर्ज भरून घेतले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन असतील, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांनी चांगले काम केल्याचे त्यांनी सांगितले.

निलेश मोरे यांनी दिली चांदीची तलवार भेट
सातारा शहर प्रमुख निलेश मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांदीची तलवार भेट दिली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत मोबाईलचा टॉर्च लावून महिला भगिणींनी केले.

दोन्ही भावांना बांधल्या राख्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महिलांनी राख्या बांधल्या. राख्या बांधण्यासाठी महिलांची झुंबड उडाली होती. काहींनी तर हा क्षण अविस्मरणीय असा असल्याचे सांगितले.

Advertisement
Tags :

.