महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

प्रवासी महिलांनो सावधान...

11:05 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रिक्षा-बसमध्ये चोरी प्रकारांमध्ये वाढ : भुरट्या चोऱ्या करणाऱ्या महिलांची टोळी सक्रिय

Advertisement

बेळगाव : अलीकडच्या काळात बेळगावमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेच. मात्र, अगदी सहजगत्या रिक्षात किंवा बसमध्ये चोऱ्या होण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. भुरट्या चोऱ्या करणाऱ्या महिलांची एक टोळीच सक्रिय झाली आहे. या चोरट्या महिला बसस्थानक व रिक्षास्थानक परिसरात रेंगाळताना दिसून येतात आणि कोणाला काही समजायच्या आत पर्समध्ये हात घालून पैसे, वस्तू, मोबाईल किंवा पर्सच लांबवितात. साधारणत: या महिला रिक्षात बसताना एखादी महिला आधीच रिक्षात बसली असेल तरी तिघी जणी एकत्रच बसण्यासाठी रिक्षा चालकावर दबाव आणतात व आधी बसलेल्या प्रवासी महिलेला ढकलण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान तिच्या शेजारी भुरट्या चोऱ्या करणारी महिला आपली पर्स समोर आडवी धरते आणि आधी बसलेल्या महिलेच्या पर्समधील वस्तू सहजगत्या लांबवून स्टॉप नसला तरी चटकन उतरून पसार होते.

Advertisement

ही महिला पर्समधील वस्तू लांबविण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरी महिला मागून गळ्यातले खेचण्याचा प्रयत्न करते. या महिला प्रवासी असाव्यात म्हणून रिक्षाचालक त्यांना रिक्षात घेतो. परंतु त्यांच्या हालचाली पाहून त्यांनीही सावध व्हायला हवे. सीबीटी, चन्नम्मा सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, गोवावेस, अनगोळ नाका अशा मोक्याच्या बसस्थानकांवर या महिला रेंगाळताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर बसमधून किंवा रिक्षामधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य महिलांनी आपल्या दागिन्यांची व प्रामुख्याने पर्सची काळजी घ्यायला हवी. तसाच काही प्रकार घडल्यास त्वरित त्या महिलांनी जाब विचारायला हवा. किंवा त्यांचा फोटो काढून घ्यायला हवा. मात्र, कदाचित त्यांच्याकडे एखादे हत्यार असू शकते, याचेही भान बाळगायला हवे. अलीकडच्या काळात बेळगावमध्ये चोरी करण्यामध्ये महिलांची संख्या वाढत चालली आहे. अपुरे मनुष्यबळ ही पोलीस खात्याची कायमचीच अडचण आहे. तथापि वाहतूक पोलिसांना कधी तरी बसस्थानकावरही फेरफटका मारण्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करणे आवश्यक आहे.

बसमधील गर्दीचा उठविताहेत फायदा...

आपल्या शेजारी बसलेली महिला कोण आहे, याचा अंदाजही सर्वसामान्य प्रवासी महिलांना येत नाही. प्रामुख्याने या भुरट्या चोऱ्या करणाऱ्या महिला बसमध्ये गर्दीचा फायदा उठवून चोरी करत आहेत. अलीकडे सरकारच्या ‘शक्ती’ योजनेमुळे महिलांना मोफत बसप्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. परिणामी बसमध्ये गर्दी वाढत आहे. नेमका याचाच फायदा भुरट्या चोऱ्या करणाऱ्या महिला घेत आहेत. हे लक्षात घेत आपल्या दागिन्यांची, पर्सची, मोबाईलची व अन्य सामानाची काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article