महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लादेनच्या निकटवर्तियाला पाकिस्तानमध्ये अटक

07:00 AM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ओसामाच्या सुरक्षेची सांभाळत होता जबाबदारी

Advertisement

वृत्तसंस्था /इस्लामाबाद

Advertisement

पाकिस्तानमधील अल कायदाचा म्होरक्मया आणि ओसामा बिन लादेनचा निकटवर्तीय अमीन-उल-हक याला अटक करण्यात आली आहे. पंजाब प्रांतातील दहशतवादविरोधी विभागाने (सीटीडी) शनिवारी ही माहिती दिली. अल कायदाचा वरिष्ठ कमांडर अमीन-उल-हक गुजरात विभागातील सराय आलमगीर शहरात असल्याची माहिती ‘सीटीडी’ला प्राप्त झाली होती. त्यानंतर व्यापक मोहीम हाती घेत त्याला अटक करण्यात आली. अमीन उल-हक हा अफगाणिस्तानचा रहिवासी असला तरी त्याच्याकडून पाकिस्तानचे ओळखपत्र सापडले आहे. हे ओळखपत्र लाहोर आणि हरिपूर येथील पत्त्यावर बनवण्यात आले आहे.

पंजाबमध्ये अमीन-उल-हकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर दहशतवादाशी संबंधित कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी ‘सीटीडी’ने सविस्तर माहिती दिलेली नाही. दहशतवादाविऊद्धच्या लढाईत आपल्याला मोठे यश मिळाले आहे. सध्या अमीन उल-हक याला चौकशीसाठी अज्ञातस्थळी पाठवण्यात आले आहे. अमीन हा ओसामा बिन लादेनचा जवळचा सहकारी असल्याचे प्रवक्त्याने सांगितले. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी यादीतही त्याचे नाव समाविष्ट आहे. अमेरिकेने 2001 मध्ये जागतिक दहशतवाद्यांची यादी जाहीर केली होती. ज्यात अमीनचे नाव होते. अनेक वर्षांपासून लादेन आणि अल कायदाशी संबंध असल्याने त्याची अटक महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने अद्याप यासंदर्भात कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article