महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘लाडकी बहीण’ ठरणार गेम चेंजर

06:45 AM Oct 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री शिंदे यांचा विश्वास : महायुतीचे रिपोर्ट कार्ड सादर :संयुक्त प्रचाराला सुरूवात 

Advertisement

प्रतिनिधी, मुंबई : 

Advertisement

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 ची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या घोषनेनंतर महायुतीने प्रचाराला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महायुतीच्या रिपोर्ट कार्डचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित बुधवारी झाले. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, माजी विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर आदी उपस्थित होते. राज्यात

‘लाडकी बहीण’ योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील सर्व लाडक्या बहिणी सरकारच्या पाठिशी आहेत. यामुळे ही योजना गेम चेंजर झाली असून ती आता पुढेही गेम चेंजर ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. मात्र विरोधक ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले आहेत. महाविकास आघाडी आमच्या सर्व योजना बंद करण्याची भाषा करीत असून आमच्या लाडक्या बहिणी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत, अशी तुफान फटकेबाजी करत विरोधकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली.

तीन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने महायुतीच्या भ्रष्टाचाराचा पंचनामा करणारा रिपोर्ट प्रसिद्ध केला होता, त्याला महायुतीकडून उत्तर देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, विरोधकांनी आमची टिंगलटवाळी केली, विरोधक गडबडलेले आहेत, ते घाबरलेत असे म्हणणार नाही पण गडबडले आहेत, असे अजित पवार म्हणाले. तर ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला त्यांनी आम्हाला कायदा शिकवू नये, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

मराठा समाजाला फवणारे कोण ते जरांगेनी ओळखावे

ओबीसीला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले. पण या आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जाणारे कोण आहेत? मराठवाड्यात मराठा समाजाला प्रथमच कुणबी प्रमाणपत्र मिळाली. त्यांच्यासाठी महामंडळ स्थापन केले. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दिलेले आरक्षण यांनी घालवले. मराठा समाजाला फसवणारे कोण आहेत, हे  मनोज जरांगे पाटील यांनी ओळखला हवे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

विरोधी पक्षनेतेपदाचा चेहरा ठरवा

आमची जागावाटपाची चर्चा योग्य दिशेने सुऊ आहे. आमचे जागावाटप लवकरच जाहीर करणार आहोत. आमच्याकडे कुणालाही मुख्यमंत्री होण्याचे डोहाळे लागलेले नाहीत. आमचा मुख्यमंत्रीपदाबाबत काहीच घोळ नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. त्यांच्यात घोळ सुऊ आहे. आमचे काम हाच आमचा चेहरा आहे. महाविकास आघाडीने आता विरोधी पक्षनेत्याचा चेहरा ठरवावा, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला.

आम्हाला कायदा सुव्यवस्थेबाबत सांगू नका : उपमुख्यमंत्री फडणवीस

ज्यांनी पैसे घेऊन अधिक़ाऱ्यांच्या बदल्या केल्या. ज्या सरकारच्या काळात त्यांचे गफहंमत्रीच तुऊंगात गेले. देशातील सगळ्यात मोठ्या उद्योगपतीच्या घरासमोर ज्यांच्या काळात पोलिसांनीच बॉम्ब ठेवले. हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून पोलिसांनीच हत्या केली, ते सरकार आता आम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सांगत आहेत, असा टोला राज्याचे गफहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे विरोधकांनी सत्ताध़ाऱ्यांवर निशाणा साधला. गफहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मागणीला आता फडणवीसांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सविस्तर उत्तर दिले

महायुती सरकारचे काम पाहून विरोधक गडबडले : उपमुख्यमंत्री अजित पवार

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की महायुती सरकारचे अभूतपूर्व काम पाहून विरोधक गडबडले आहेत, सर्वसामान्यांच्या जीवनात घडलेले बदल विरोधकांच्या पचनी पडत नसल्याने उठसूठ फेक नरेटिव्ह प्रस्थापित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. राज्य कर्जबाजारी, लाडकी बहीण योजनेबाबत खोटा प्रचार होत आहे. महायुती सरकारने समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून त्यांचे जीवन बदलणा‚या असंख्य योजना आणून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. आमच्या 2 कोटी 30 लाख लाडक्या बहीणींच्या खात्यात पाच महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत.लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न करणा‚या आणि दूषणे देणा‚यांना  सांगतो की या योजनेसाठी आधी 10 हजार कोटी नंतर 35 हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. ही योजना तात्पुरती नाही, असेही  पवार यांनी सांगितले.

रिपोर्टकार्ड नव्हे रेटकार्डवर बोलावे : नाना पटेले

महायुती सरकारने गेल्या दोन वर्षात मोदी-शाह यांच्या आदेशाने महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले असून महाराष्ट्र हे मोदी शहा यांच्यासाठी फक्त एटीएम आहे. राज्यात प्रस्तावित असलेले मोठे प्रकल्प गुजरातला पळवून नेले. तरीही शिंदे, फडणवीस व अजित पवार मूग मिळून गप्प बसले होते. फडणवीस यांनी गुजरातमधील गुंतवणूकीचे समर्थन केले. उद्योगधंदे गुजरातला व गुजरातचे ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तऊण पिढी बरबाद करण्याचे पाप या सरकारने केले आहे. मुंबईतील महत्वाच्या जमिनी लाडक्या उद्योगपतीच्या घशात घातल्या व टेंडर मागून टेंडर काढून कंत्राटदारांचे भले केले व त्यातून मलई खाण्याचे काम दोन वर्ष बिनबोभाटपणे सुऊ आहे. या सरकारने रिपोर्ट कार्ड बोलणे हास्यास्पद असून रिपोर्टकार्ड नव्हे तर रेटकार्डवर बोलावे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

 जल-जंगल-जमीन-समुद्र अदानीच्या घशात घालणार : आमदार आदित्य ठाकरे

राज्यातील सरकार अदानीसाठी काम करत असून आचारसंहिता लागण्यापूर्वी देवनारचा भूखंड सरकारने अदानीला दिला. धारावी प्रकल्पसाठी एकूण 1080 एकर मुंबईची जमीन अदानीला फुकटात घातली. हेच सरकार आलं जल-जंगल-जमीन आणि अरबी समुद्रालासुद्धा अदानीचे नावे कऊन देतील. भाजप आणि शिंदे यांचे मालक अदानी असून त्यासाठी हे सगळे करत असल्याचा आरोप ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article