महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लाबुशेनच्या खेळीने ऑस्ट्रेलियाला सावरले

06:14 AM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दुसरी कसोटी, पावसाचा अडथळा, ऑस्ट्रेलिया तीन बाद 187

Advertisement

वृत्तसंस्था/ मेलबर्न

Advertisement

तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत येथे मंगळवारी बॉक्सिंग डे दिवशी सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसामुळे सुमारे तीन तासांचा खेळ वाया गेला. दरम्यान यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात दिवसअखेर 66 षटकात 3 बाद 187 धावा जमविल्या. लाबुशेनने चिवट फलंदाजी करत संघाला सावरले. लाबुशेन 44 तर हेड 9 धावांवर खेळत होते.

या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत पर्थमध्ये पाकिस्तानचा 360 धावांनी दणदणीत पराभव करत आघाडी घेतली आहे. या दुसऱ्या कसोटीत पाकने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. पाकच्या गोलंदाजांनी ढगाळ वातावरणाचा पुरेपूर फायदा घेत ऑस्ट्रेलियाला रोखण्यात यश मिळविले. पाकच्या गोलंदाजांनी 66 षटकांच्या खेळामध्ये ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा आणि स्टिव्ह स्मिथ हे तीन महत्त्वाचे फलंदाज बाद केले.

पाकचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. पाकच्या शाहिन आफ्रिदी, हमजा आणि हसन अली यांनी ढगाळ वातावरण आणि खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेतला. उपाहारापर्यंतच्या सत्रातील 27.1 षटकात ऑस्ट्रेलियाने सावध फलंदाजी करताना 90 धावा जमविताना डेव्हिड वॉर्नर हा एकमेव गडी गमविला. पर्थच्या पहिल्या कसोटीत वॉर्नरने 164 धावांची खेळी केली होती. वॉर्नरची ही शेवटची कसोटी मालिका आहे. वॉर्नरला 2 धावावर असताना पाकच्या शफीककडून जीवदान मिळाले. वॉर्नर आणि ख्वाजा या जोडीने 97 चेंडूत पहिल्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी केली. उपहारापूर्वीच्या शेवटच्या षटकात पाकच्या आगा सलमानने वॉर्नरला बाबर आझमकरवी झेलबाद केले. त्याने 83 चेंडूत 3 चौकारांसह 38 धावा जमविल्या.

उपाहारानंतर ऑस्ट्रेलियाचे शतक 183 चेंडूत फलकावर लागले. हसन अलीने उस्मान ख्वाजाला आगा सलमानकरवी झेलबाद केले. त्याने 101 चेंडूत 5 चौकारांसह 42 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाने 42.4 षटकात 2 बाद 114 धावा जमविल्या असताना पावसाला प्रारंभ झाल्यामुळे पंचांनी खेळ थांबविला. चहापानावेळी ऑस्ट्रेलियाची स्थिती 42.3 षटकात 2 बाद 114 अशी होती. लाबुशेन 14 तर स्मिथ 2 धावावर खेळत होते. खेळाच्या शेवटच्या सत्राला पावसाने विश्रांती घेतल्यानंतर खेळाला सुरूवात झाली. आणि पाकच्या अमीर जमालने स्टिव्ह स्मिथला रिझवानकडे झेल देण्यास भाग पाडले. स्मिथने 75 चेंडूत 2 चौकारांसह 26 धावा जमविताना लाबुशेनसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 46 धावांची भर घातली.  लाबुशेनने खेळपट्टी आणि ढगाळ वातावरणाची अंदाज घेत संथ फलंदाजी केली. त्याला दिवसअखेर हेडकडून साथ मिळाली. ऑस्ट्रेलियाने 66 षटकात 3 बाद 187 धावा दिवसअखेर जमविल्या. लाबुशेन 120 चेंडूत 3 चौकारांसह 44 तर हेड 19 चेंडूत 1 चौकारासह 9 धावावर खेळत होते. ऑस्ट्रेलियाच्या डावात 28 अवांतर धावा नोंदविल्या गेल्या आहेत. पाकतर्फे हसन अली, अमीर जमाल आणि आगा सलमान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या कसोटीच्या पहिल्या दिवशी सुमारे 62 हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती.

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प. डाव 66 षटकात 3 बाद 187 (वॉर्नर 3 चौकारांसह 38, ख्वाजा 5 चौकारांसह 42, लाबुशेन 3 चौकारांसह 44 धावांवर खेळत आहे, स्मिथ 2 चौकारांसह 24, हेड खेळत आहे 9, अवांतर 28, हसन अली 1-28, अमीर जमाल 1-47, आगा सलमान 1-5).

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article