गुजरातमध्ये मजूर कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न
06:10 AM Apr 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पालकांचा मृत्यू, 3 मुलांची प्रकृती गंभीर
Advertisement
साबरकांठा :
गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील वडाली येथे रविवारी सकाळी एक दु:खद घटना उघडकीस आली. येथे एका मजूर वर्गाच्या कुटुंबातील पाच सदस्यांनी विष प्राशन केले. उपचारादरम्यान पालकांचा मृत्यू झाला असून तिन्ही मुलांची प्रकृतीही चिंताजनक आहे. अधिक उपचारांसाठी मुलांना अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तथापि, कुटुंबाने हे पाऊल का उचलले? हे अद्याप उघड झालेले नाही. वडालीच्या सागरवास येथे राहणारे हे कुटुंब शेतात काम करून आपला उदरनिर्वाह करत होते.
Advertisement
Advertisement