Satara Crime : कोरेगाव एसटी स्टॅण्डवर मजुराला उसाने मारहाण
कोरेगाव पोलिसांची तत्काळ कारवाई
एकंबे : कोरेगाव येथील नवीन एसटी स्टॅण्ड परिसरात एका मजूर व्यक्तीला अज्ञात इसमाने उसाने मारहाण केल्याची घटना ३ डिसेंबर रोजी सकाळी घडली. याप्रकरणी कोरेगाव पोलिसांत शनिवारी पहाटे एक वाजता गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, फिर्यादी बिटू तुकाराम टिंगरे (वय ६५,रा. कव्हे, ता. माढा, जि. सोलापूर) हे मजुरीचे काम करतात. ते अज्ञात इसमाच्या गाडीत बसून कोरेगावकडे येत होते. कोरेगाव एसटी स्टॅण्डजवळ आल्यानंतर त्या इसमाने गाडी थांबवून त्यांना खाली उतरायला सांगितले.
फिर्यादी खालीउतरल्यानंतर तो इसम त्यांना तेथेच सोडून निघून जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, फिर्यादीने त्या इसमाकडे दारू पिण्यासाठी काही पैसे द्या अशी विनंती केली असता त्या व्यक्तीने रागाच्या भरात उसाने त्यांना मारहाण केली. या प्रकारानंतर जखमी अवस्थेतील फिर्यादीचा जबाब नोंदवून कोरेगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हवालदार राजू शिंदे तपास करत आहेत.