For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कामगार आयुक्तांचे ‘पेटीएम’ला समन्स

07:00 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
कामगार आयुक्तांचे ‘पेटीएम’ला समन्स
Advertisement

काही कर्मचाऱ्यांची छाटणी केल्याचा परिणाम : प्रादेशिक कामगार आयुक्तांची कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

बेंगळूरूच्या प्रादेशिक कामगार आयुक्तांनी पेटीएमची मूळ कंपनी वन-97 कम्युनिकेशन्सला समन्स बजावला आहे. काही कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने बाहेर काढल्याप्रकरणी कंपनीला हे समन्स बजावण्यात आले आहे. काही काळापूर्वी कंपनीशी संबंधित काही कर्मचाऱ्यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. कायद्याचे उल्लंघन करून कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने बाहेर काढल्याचा आरोप कंपनीवर करण्यात आला होता. ही सूचना उपमुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय) श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या प्रादेशिक कामगार आयुक्त (केंद्रीय) यांनी जारी केली आहे. नोटीसनुसार पेटीएमचे व्यवस्थापन आणि तक्रारदारांना सर्व आवश्यक नोंदीसह कामगार विभागाच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

Advertisement

आम्ही कर्मचाऱ्यांच्या योगदानाची कदर करतो: पेटीएम

या प्रकरणी पेटीएमचे प्रवत्ते म्हणाले, ‘आम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे महत्त्व समजतो आणि त्यांच्या समर्पणाची प्रशंसा करतो. काही कर्मचाऱ्यांना सोडण्याचा निर्णय कठीण होता आणि सर्व उपलब्ध पर्यायांचा विचार करूनच तो निर्णय घेण्यात आला आहे.’ छाटणी केलेल्या कर्मचाऱ्यांना शक्य तितकी मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात.

व्यवस्थापन संघाने असेही म्हटले आहे की त्यांनी कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि संपूर्ण प्रक्रियेत निष्पक्षता आणि पारदर्शकता राखली आहे. प्रवक्त्याने सांगितले की, ‘आम्ही प्रभावित कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी उपलब्ध आहोत. याशिवाय, आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी सर्व संबंधित पक्षांसोबत यापुढेही काम करत राहू.’

Advertisement
Tags :

.