'लापता लेडीज' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर
आता भारताला 'अनुजा'कडून अपेक्षा
ऑस्कर २०२५
'ऑस्कर २०२५' साठी भारताकडून 'लापता लेडीज' (lost ladies) ची एण्ट्री होती. पण भारताचं स्वप्न भंगलं आहे. ऑस्करच्या च्या अंतिम १५ चित्रपटाच्या यादीत 'लापता लेडीज' च नाव नाही आहे.
यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' या चित्रपटाला भारताकडून एण्ट्री मिळाली होती. पण ९७ व्या 'ऑस्कर पुरस्कार २०२५' च्या शर्यतीतून हा सिनेमा बाहेर पडला आहे. १७ जानेवारीला ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सर्व नामांकने जाहीर होतील. तर २ मार्च २०२५ रोजी हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
पण ऑस्करच्या अंतिम १५ चित्रपटांच्या यादीत हिंदी भाषेत चित्रित केलेल्या ब्रिटीश-भारतीय "संतोष" या चित्रपटानं स्थान पटकावलं आहे, अशी घोषणा अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्टंस अॅण्ड सायन्सेस (AMPAS) ने केली. पण हा चित्रपट ब्रिटन चे प्रतिनिधित्व करणार आहे. ऑस्करसाठी भारताकडून लापता लेडीज या सिनेमाची निवड झाली होती. त्याप्रमाणे युके ने "संतोष" या चित्रपटाची निवड केली होती. या सिनेमाचे दिग्दर्शन संध्या सुरी यांनी केले आहे.
लापता लेडीज ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी भारताची आशा अजून संपलेली नाही. ऑस्करच्या लघुपटाच्या शर्यतीसाठी गुनीत मोंगा कपूर निर्मित लाईव्ह-अॅक्शन शॉर्ट फिल्म 'अनुजा' हा लघुपटा शॉर्टलिस्ट झाला आहे. हा लघुपट वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर आधारित आहे. या लघुपटात अभिनेते नागेश भोसले यांच्यासह अनेक कलाकार आहेत. १८० लघुपटांमधून याची निवड झाली आहे, याचा मला आनंद झाला अशी प्रतिक्रिया ऑस्कर अकदमीचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर यांनी दिली. गुनीत मोंगा या लघुपटाच्या कार्यकारी निर्माती आहेत.