कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एल. के. डांगी यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

04:41 PM May 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

ओटवणे प्रतिनिधी

Advertisement

पारपोली गावचे सुपुत्र तथा कुडासे येथील सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचे गणित शिक्षक एल के डांगी यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. गोवा साखळी येथे बेळगावी येथील नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटीच्यावतीने कर्नाटक राज्याचे पोलीस कमांडर अरविंद गट्टी यांच्याहस्ते कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे, गोवा राज्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी प्रशांत नाईक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. गणित शिक्षक असलेल्या एल के डांगी यांनी विद्यार्थ्यांमध्ये गणितीय दृष्टीकोन वाढावा यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारसाठी निवड करण्यात आली. एल के डांगी यांना यापूर्वीमहाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाचा आदर्श गणित शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला होता.
एक शांत, संयमी आणि प्रामाणिक गणित शिक्षक अशी एल के डांगी यांची ओळख आहे. त्यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रासह धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा कल्पना तोरसकर, कार्याध्यक्ष मिलिंद तोरसकर, सर्व संचालक आणि समन्वय समिती सचिव रश्मी तोरसकर, सहसचिव नंदकुमार गवस, मुख्याध्यापक शिक्षक कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# traun bharat sindhudurg # news update # konkan update # marathi news
Next Article