काइली जेनरने दिली नात्याची कबुली
अमेरिकन अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये
27 वर्षीय काइली जेनर चाहत्यांदरम्यान अत्यंत लोकप्रिय आहे. ती एक बिझनेसवुमन असण्यासोबत सोशलाइट देखील आहे. तिच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमी उत्सुक असतात. किम कदार्शियन आणि क्लोई कदार्शियनची सावत्र बहिण स्वत:च्या लव्ह लाइफवरून चर्चेत असते. तिची डेटिंग हिस्ट्री अत्यंत चर्चेत राहिली आहे.
कॅनेडियन रॅपर ड्रेकपासून 6 वर्षांपूर्वी विभक्त झाल्यावर काइलीने काही काळापर्यंत कुणालाच डेट केले नाही. परंतु 2023 मध्ये तिने अमेरिकन अभिनेत्याला डेट करण्यास सुरुवात केली, याचा खुलासा आता तिने केला आहे. काइलीने अलिकडेच रोममध्ये अमेरिकन अभिनेता टिमोथी चालमेटसोबत ग्रँड एंट्री घेतली. रेड कार्पेटवर दोघांनी स्वत:च्या प्रेमाची कबुली दिली आहे. काइली जेनरने सर्वप्रथम रॅपर टायगाला डेट केले होते. दोघेही सुमारे 3 वर्षांपर्यंत नात्यात राहिले. 2017 मध्ये दोघांनी हे नाते संपुष्टात आणले. त्याच्यापासून विभक्त झाल्यावर काइलीने ट्रेविस स्कॉटला डेट केले आणि एका मुलीला जन्म दिला.
याचबरोबर काइलीने कॉडी सिम्पसन, जेडन स्मिथ, ड्रेकलाही डेट केले. मागील दोन वर्षांपासून ती टिमोथी चालमेटला डेट करत आहे. ट्रेव्हिस स्कॉटपासून काइलीला एक मुलगी आणि मुलगा आहे.