For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दाणोलीत उद्या आणि रविवारी रेशन लाभार्थ्यांसाठी केवायसी कॅम्प

04:27 PM Dec 26, 2025 IST | अनुजा कुडतरकर
दाणोलीत उद्या आणि रविवारी रेशन लाभार्थ्यांसाठी केवायसी कॅम्प
Advertisement

रेशन लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
दाणोली येथील रास्त धान्य दुकानात रेशन कार्डवरील सर्व लाभार्थ्यांची केवायसी करण्यासाठी शनिवार २७ व रविवार २८ डिसेंबर रोजी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी न चुकता केवायसी पूर्ण करावी असे आवाहन दाणोली रास्त भाव धान्य दुकानच्यावतीने करण्यात आले आहे.शासनाच्या आदेशानुसार रेशनकार्ड वरील प्रत्येक लाभार्थ्याची केवायसी करणे बंधनकारक आहे. यासाठी येताना रेशन कार्ड वरील प्रत्येक लाभार्थ्यांनी येताना सोबत रेशन कार्ड, कार्डवरील प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड, मोबाईल घेऊन येणे असे आवाहन दाणोली रास्त भाव धान्य दुकानच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.