रत्नागिरी सहाय्यक मत्स्य आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार कुवेसकरांकडे
रत्नागिरी :
येथील सहाय्यक आयुक्त ( मत्स्य तांत्रिक) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सिंधुदुर्गचे सहाय्यक मत्स्य आयुक्त व्यवसाय (तांत्रिक) सागर कुवेसकर यांच्याकडे देण्यात आला आहे. मत्स्य आयुक्त किशोर तावडे यांनी याबाबत गुरुवारी कार्यालयीन आदेश दिले आहेत. मात्र दोन जिल्ह्यांचे पदभार एकाच अधिकाऱ्यावर सोपविण्यात आल्याने मत्स्य विभागाच्या कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शक्यतामच्छीमारांकडून वर्तविली जात आहे. याअगोदर रत्नागिरी जिल्हा सहाय्यक मत्स्य आयुक्त या पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी मत्स्य विकास अधिकारी आनंद पालव यांच्याकडे देण्यात आला होता. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी आता या पदाचा अतिरिक्त कार्यभार सिंधुदुर्ग सहाय्यक मत्स्य आयुक्त कुवेसकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पुढील आदेश होईपर्यंत ते अतिरिक्त कार्यभार सांभाळणार असल्याचे कार्यालयीन आदेशात म्हटले आहे.