For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुशवाह यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन ?

06:02 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
कुशवाह यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

बिहारमधील नेते उपेद्र कुशवाह हे आपला पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करणार आहेत, अशी चर्चा आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरीष्ठ नेतृत्वाची या संदर्भात भेट घेऊन चर्चा केली असून त्यांना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या माध्यमातून राज्यसभेवर पाठविण्यात येईल, असे ठरविण्यात आले आहे. कुशवाह यांच्या पक्षात प्रवेशामुळे बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाचे बळ वाढण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली असून त्यांच्या पक्षाचे अनेक कार्यकर्तेही भारतीय जनता पक्षात येतील अशी शक्यता आहे. बिहारमधून कुशवाह यांची राज्यसभेसाठी उमेदवारीही घोषित करण्यात आल्याने या वृत्ताला पाठबळ मिळत आहे. कुशवाह यांच्या पक्षाचे काही कार्यकर्ते मात्र, या निर्णयामुळे नाराज असल्याचे वृत्त असून त्यांची समजूत काढण्यात येईल, असे कुशवाह यांनी स्पष्ट केले. ते आपला पक्ष केव्हा भारतीय जनता पक्षात विलीन करणार याविषयी अद्याप स्पष्टता नाही, तथापि, लवकरच हा निर्णय घेतला जाईल, असे बोलले जात आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.