For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kurundwad Breaking : कुरुंदवाड सत्ताधारी काँग्रेसचा पराभव : राजर्षी शाहू विकास आघाडीची सरशी ; भाजप शून्य!

03:36 PM Dec 21, 2025 IST | NEETA POTDAR
kurundwad breaking   कुरुंदवाड सत्ताधारी काँग्रेसचा पराभव   राजर्षी शाहू विकास आघाडीची सरशी   भाजप शून्य
Advertisement

                          कुरुंदवाड पालिकेत  राजर्षी शाहू विकास आघाडीची  सत्ता काबीज

Advertisement

by रवींद्र केसरकर 

कुरुंदवाड : येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसचा पराभव करत राजर्षी शाहू विकास आघाडीने सत्ता काबीज केली  तर या वेळच्या निवडणुकीत भाजपला भोपळाही फोडता आला नाही.

Advertisement

     येथील पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडी व भाजपाचे नेते डॉ.संजय पाटील, माधवराव घाटगे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी अशी तिरंगी लढत झाली होती.

येथे मोठ्या चुरशीने 82.90% मतदान झाले. यामुळे  पालिकेवर सत्ता कधीच कोण करणार याकडे शहर वासियांचे लक्ष लागून राहिले होते. आज येथील पालिकेच्या तबक मैदान जिग्नेशियम हॉल येथे सकाळी दहा वाजता मतमोजणी प्रारंभ झाला. सकाळी  10.45 वाजता पहिली फेरी झाली यामध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा डांगे यांनी आघाडी घेतली ही आघाडी शेवटपर्यंत राहिली.

  चुरशीने झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह 12 जागेवर निर्विवाद विजय मिळवत राजर्षी शाहू आघाडीने सत्ता काबीज केली. तर सत्ताधारी काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत काँग्रेसला केवळ आठ जागांवरच विजय मिळवता आला.मागील वेळेच्या विरोधी बाकावर असलेल्या भारतीय जनता पार्टीला यावेळी भोपळाही फोडता आला नाही.

  राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. डांगे यांच्या मुरब्बी व अनुभवी नेतृत्वामुळे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू आघाडीला येथे सत्ता काबीज करता आली. या निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा डांगे यांनी काँग्रेसच्या योगिनी पाटील यांचा 2 हजार मतांनी पराभव केला.

  राजर्षी शाहू विकास आघाडी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मनीषा डांगे यांना (9569), विरोधी काँग्रेसच्या योगिनी पाटील यांना(7569) मते मिळाली तर भाजपाच्या समीरा जोशी यांना(1057) मतावर समाधान मानावे लागले.  सकाळी 11 वाजल्यापासूनच प्रभाग निहाय व न्याराध्यक्ष पदाचे निकाल बाहेर येताच राजश्री शाहू विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाकांची गुलाबाची उधळण व मोटरसायकल रॅली कडून साजरा केला. संपूर्ण शहरातील रस्ते गुलालमय झाले होते.

Advertisement
Tags :

.