For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime | कुरुंदवाड पोलिसांचा घोसरवाडमध्ये छापा; २ लाख ८४ हजारांच्या मुद्देमालासह ५ जुगारी अटकेत

02:05 PM Apr 08, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime   कुरुंदवाड पोलिसांचा घोसरवाडमध्ये छापा  २ लाख ८४ हजारांच्या मुद्देमालासह ५ जुगारी अटकेत
Advertisement

                       दत्तवाड रस्त्यावरील विजापूरे मळ्यात जुगाराचा डाव उधळला

Advertisement

कुरुंदवाड : घोसरवाड ता. शिरोळयेथील जुगार अड्ड्यावर कुरुंदवाड पोलिसांनी छापा टाकून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करत रोख रक्कम, दुचाकी वाहने व जुगाराचे साहित्य असा २ लाख ८४ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फिर्याद पोलीस नाईक सचिन कऱ्याप्पा पुजारी यांनी दिली आहे.

या प्रकरणी शिवाजी सखाराम चव्हाण, संदीप राजू चव्हाण, रावसो कृष्णप्पा म्हेत्रे, तानाजी प्रकाश भोसले आणि बाळासो गणपती पाटील (सर्व रा. कळम्मवाडी बसाहत, ता. शिरोळ) यांच्याबर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

घोसरवाड हद्दीतील दत्तवाड रस्त्यावरील विजापूरे मळा रस्त्यावरील प्रताप मोहिते यांच्या शेतात असलेल्या झाडाखाली संशयित आरोपी हे बेकायदेशीररित्या पत्त्यांचा जुगार खेळत असताना पोलिसांना मिळून आले. या कारवाईत पोलिसांनी रोख ४ हजार, ६६० रुपये, पत्त्यांचा संच तसेच विविध कंपन्यांच्या चार मोटरसायकली असा एकूण २ लाख, ८४ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे

Advertisement
Tags :

.