कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Ganeshotsav 2025: कुरुंदवाडमधील श्री गणपती मंदिरातील गणेशोत्सवाला 129 वर्षांची परंपरा

12:58 PM Aug 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात यावर्षी 129 वा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय

Advertisement

By : रवींद्र केसरकर 

Advertisement

कुरुंदवाड :  ग्रामदैवत श्री गणपती मंदिराचा परिसर सर्वांना आशीर्वचनीय ठरावा, या दृष्टीने गेली 129 वर्षे त्या त्या काळातील समाजधुरिणांनी कुरुंदवाडच्या संस्थांनकालीन वेशीलगत असलेल्या प्राचीन गणपती मंदिराची निगराणी केली. श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात यावर्षी 129 वा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

कुरूंदवाडमध्ये 129 वर्षांपूर्वी ग्रामदैवताची सेवा करावी, या हेतूने 1897 साली श्री गणपती उत्सव मंडळाची स्थापना लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रेरणेतून झाली. तेव्हापासून आजतागायत श्री गणपती उत्सव मंडळ अविरतपणे कार्यरत आहे. वर्षभरातील विविध धार्मिक, समाज प्रबोधनपर उपक्रम आयोजिले जातात.

2015 साली कुरुंदवाड पंचक्रोशीतील लोकांना सामाजिक उपक्रम आयोजित करता यावेत, या हेतूने मंदिराच्या जागेत 7500 स्क्वेअर फुटाचे सभागृह आणि भक्तनिवास उभारले. 2024 साली मंदिराचा गाभारा,समोरील सभा मंडपाचा जीर्णोद्धार केला. कान्हेरे कुटुंबियांची शाश्वत ठेव मंदिरातील गणेशमूर्ती काळया पाषाणात घडवलेली आहे.

अतिशय विलोभनीय अशी आहे.गणपतीची नित्य पूजा करणारे कान्हेरे कुटुंबीयांनी आपल्यानंतरही गणपतीची नित्य पूजा, विविध कार्यक्रम सुरू राहावेत यासाठी गणपती मंडळाला त्यावेळी 5 लाखांची देणगी शाश्वत ठेव म्हणून दिली. यातून येथील नित्य पूजा, उत्सव सुरू आहेत. गणेशमूर्ती 365 वर्षांइतकी प्राचीन चित्रकूट येथील आचार्य वेदांती भगवानदासजी येथे भागवत सप्ताहाला आले होते.

याप्रसंगी ग्रामदैवताचे दर्शन घेण्यासाठी ते या मंदिरात आले. श्रद्धेय वेदांतीजी गणेशमूर्तीच्या दर्शनाने तल्लीन झाले. त्यांच्या आत्मज्ञानातून आलेल्या प्रचितीतून ते म्हणाले, ‘ही मूर्ती किमान 365 वर्षाची आहे. देवस्थान अत्यंत जागृत आहे. श्रद्धापूर्वक या गजाननाची पूजाअर्चा करणाऱ्या सर्वांनाच श्री गजाननाच्या आशीर्वादाची गोड फळे मिळतील.

गणपती मंदिरामुळे गावच्या सौंदर्यात भर पडली आहे. गणेश जयंती, गणेशोत्सव, संकष्टी, अंगारकी संकष्टी, विनायकी निमित्त धार्मिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण, भागवत सप्ताह करण्यात येतो. दैनंदिन पूजाअर्चा, अभिषेक होतो. संकष्टीला पंचक्रोशीतील लोक आवर्जून येथे दर्शनाला येतात.

आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, वत्तृत्व स्पर्धा, होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत या विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून केली जाते. प्रदक्षिणा मार्गावर अष्टविनायक दर्शन गणपती मंदिरात येणाऱ्या भाविकांना अष्टविनायकांचे दर्शन व्हावे, या हेतूने मंदिराच्या सभामंडपातील दर्शनी ठिकाणी प्रदक्षिणा मार्गावर अष्टविनायकाच्या अत्यंत सुबक अशा प्रतिमा साकारल्या आहेत.

यामुळे प्रदक्षिणा करताना गणेशभक्तांकडून समाधान व्यक्त होत आहे. श्री गणपती उत्सव मंडळ या विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष गणपतराव शिवराव ऊर्फ बापूसाहेब पटवर्धन (सरकार) आहेत. डॉ. दिलीप कुलकर्णी उपाध्यक्ष आहेत. प्रा. शरद पराडकर सचिव म्हणून काम पाहत आहेत. कृतिशील विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली ही विश्वस्त संस्था कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली.

मंदिराचा जीर्णोद्धार लोकवर्गणीतून

"आमच्या गावच्या ग्रामदैवताची अर्थात गणपतीची नित्यसेवा येथे होत असते. 129 वर्षापासून गणपती उत्सव सुरू आहे. इथे होणारे सर्व उपक्रम लोकवर्गणीतून होतात मंदिराचा जिर्णोद्धारही लोकवर्गणीतून झाला आहे. जागृत स्थान असल्याने गणेश भक्त मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात दर्शनानंतर त्यांना मिळणारा आत्मिक आनंद हा वेगळाच आहे."

- प्रा. शरद पराडकर, सचिव, गणपती उत्सव मंडळ, कुरुंदवाड

Advertisement
Tags :
@KOLHAPUR_NEWS#IchalkaranjiAamchya Gavacha Ganpati 2025ganeshotsav 2025ganeshotsav 2025 kurundwadkurundwad ganesh templevidhayak Ganesha
Next Article