Kurduwadi News | मध्यरात्री ११ ची वेळ, चोरपावलं अन् घरात शिरलेला 'तो' नराधम; दोन वर्षांनंतर बार्शी न्यायालयाने काय दिला निकाल?
कुर्डुवाडीत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची शिक्षा
कुडुवाडी - राहत्या घरात घुसून अल्पवयीन मुलीबर अत्याचार करणाऱ्या नराधमाला बार्शी सत्र न्यायालयाने २० बर्षे सक्त मजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. लखन ऊर्फ बापू जोतीबा सावंत (बय २९, रा. माळशिरस) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाब आहे. या निकालामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पीडितेच्या कुटुंबाला दोन वर्षात न्याय मिळाला आहे.
१ जानेवारी २०२४ च्या मध्यरात्री११ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी तिच्या घरी झोपलेली असताना, आरोपी लखन सावंत याने घरात चोर पावलाने प्रवेश केला. त्याने पीडितेवरअत्याचार केला..पीडितेनेआरडाओरडकेल्यानंतर आणितिच्या आईने तत्परता दाखवल्यानंतर आरोपीला पडूनजाण्यापूर्वीच गावातील नागरिकांनी पाडसाने पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. २ जानेवारी २०२४ रोजी कुद्दुवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात
आला होता.
सरकारी पक्षातर्फे अॅड. दिनेश देशमुख यांनी प्रभावी बाजू मांडली.गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गोपाल पवार यांनी केला, त्यांना सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. व पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले. कोर्ट पैरवी अभिकारी म्हणून पोहेकॉ योगेश मंडलिक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एकूण ८ साक्षीदार तपासले. अॅड. देशमुख यांनी युक्तीवाद करताना सांगितले आरोपीचे पीडितेच्या कुटुंबाशी कोणतेही पूर्ववैमनस्य नकते. त्यामुळे त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.