For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kupwad Crime | कुपवाड हादरले! अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीनेच केला पतीचा निर्घृण खून

04:17 PM Apr 07, 2026 IST | NEETA POTDAR
kupwad crime   कुपवाड हादरले  अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीनेच केला पतीचा निर्घृण खून
Advertisement

                            कुपवाडमध्ये प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला

Advertisement

कुपवाड : अनैतिक संबंधाचा संशय घेतअसल्याचा कारणातून पत्नीने साथीदाराच्या मदतीने पतीचा धारधार शस्त्राने खून केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. कुमवाडच्या कापसे प्लॉट परिसरातील विघ्नहर्ता कॉलनीत घटना घडली.यामध्ये दगडू सुखदेव केंगार (वय ४० रा. विघ्नहर्ता कॉलनी कापसे प्लॉट, कुपवाड) असे खून झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मयताची पत्नी छबुताई दगडू केंगार (रा. विघ्नहर्ता कॉलनी कापसे प्लॉट) व तिचा साथीदारशाहरुख फारुख मकानदार (रा. बुधगाव रस्ता कुपवाड) अशा दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद केला. याबाबत फिर्याद अश्विनी रमेश गायकवाड (वय २९ रा. कापसे प्लॉट, कुपवाड) यांनी दिली.

Advertisement

सुरवातीला खुनाच्या घटनेनंतर केंगार यांचा घातपात झाल्याचा दाट संशय त्यांची मुलगी अश्विनी तसेच आसपासच्या नागरिकांनी व्यक्त केला. याचा माग काढत पोलिसांनी तपास केला. सोमवारी सायंकाळी गुन्ह्याचा छडा लागला त्यानुसार मयताची पत्नी तसेच तिच्या साथीदाराचे नाव निष्पन्न झाले. पोलिसांनी रात्री उशिरा त्यांना अटक केली.

Advertisement
Tags :

.