For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kupwad | कुपवाड हादरले! सेंट्रिंग कामगाराच्या खुनाचा छडा; पत्नीनेच सराईत गुन्हेगाराच्या मदतीने केला पतीचा काटा

03:58 PM Apr 08, 2026 IST | NEETA POTDAR
kupwad   कुपवाड हादरले  सेंट्रिंग कामगाराच्या खुनाचा छडा  पत्नीनेच सराईत गुन्हेगाराच्या मदतीने केला पतीचा काटा
Advertisement

                कुपवाडमध्ये अलंकार कॉलनीतील पत्र्याच्या शेडमध्ये हत्या

Advertisement

कुपवाड : कुपवाड शहरात कापसे प्लॉट येथे पत्र्याच्या शेडमध्ये झालेल्या दगडू सुखदेव केंगार (वय ५२) या सेंट्रिंग कामगाराचा खून कौटुंबिक कारणातून झाल्याचे कुपवाड पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.हा खून मयताची पत्नी व सराईत गुन्हेगार या दोघांनी केल्याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी संशयितांना सोमवारी रात्री उशिरा अटक केली. छबुताई दगडू केंगार (वय४५. रा. कापसे प्लॉट, नवसाचा गणपती मंदिराजवळ, अष्टविनायक कॉलनी कुपवाड), शाहरुख फारुख मकानदार (वय २८, रा. जुना बुधगाव रोड, फकीरमळा, कुपवाड अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

मृत केंगार हा दारु पिऊन पत्नी छबुताई केंगार हिच्याशी मांडण करत होता. रविवार दि. ५ रोजी रात्री पती, पत्नी या दोघांत भांडण झाले होते. भांडण झाल्यानंतर केंगार हा अलंकार कॉलनी मधील दत्तात्रय आळगीकर यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये एकटाच झोपायला गेला. मध्यरात्री पत्नी छबुताई केंगार हिने तिच्या ओळखीचा सराईत गुन्हेगार शाहरुख मकानदारला बोलावून घेतले.

Advertisement

मकानदारच्या जवळील चाकूने संशयित छबुताई व मकानदारने झोपलेल्या दगडू केंगार याच्या पाय, पाठ, डोक्यात चाकूने सपासप वार करून खून केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी चौकशी करून छबुताई केंगार हिला ताब्यात घेऊन चौकशी केली.

Advertisement
Tags :

.