For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime | कुपवाड हादरले! पत्नीला घरात ठेवण्याच्या वादातून पोटच्या मुलाने केला जन्मदात्या आईचा खून

01:12 PM Apr 17, 2026 IST | NEETA POTDAR
sangli crime   कुपवाड हादरले  पत्नीला घरात ठेवण्याच्या वादातून पोटच्या मुलाने केला जन्मदात्या आईचा खून
Advertisement

                     कुपवाड पोलिसांची अवघ्या काही तासांत मोठी कारवाई

Advertisement

कुपवाड़ -मानमोडी येथे माणुसकीता काळिमा फाराणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला घरात ठेवण्याच्या कारणावरुन तसेच घरगुती मांडणातून रागाच्या भरात एका मुलाने आपल्याच जन्मदात्या आईचा गळा दाबून खून केला. ही बरारक घटना बुधवारी मध्यरात्री घडली. कुपवाड पोलिसांनी अवध्या काही तासांत संशयित आरोपीच्या मुराक्या आवळल्या आहेत,

संगीता जीवन झंडे (वय ५१. रा. झंडे मळा, मानमोडी) असे मूत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यांचा मुलगा जगदीश जीवन झेंडे (वय २८) याला अटक केली आहे. मयत महिलेचा भाऊ बजरंग काशिद यांनी कुपवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मवत संगीता झेंडे या पती जीवन व मुलगा जगदीश हे एकत्र झेंडे माथा मानमोडी येथे अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. जगदीशचे वडील बुधवारी रात्री कामावर गेले होते.यावेळी जगदीश व आई दोघेच घरात होते. संशयित जगवीश कोडे याचे सोनाली नावाच्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते कुटुंबाचा विरोध डावलून त्याने तिच्याशी विवाह केला होता तो आपल्या पत्नीला वारंवार परी घेऊन येत असे.

मात्र आई संगीता यांचा या गोष्टीला तीव्र विरोध होता. पत्नीता घरात ठेवण्याच्या कारणावरून माय-लेकात गेल्या अनेक दिवसांपासून खटके उडत होते. बुधवारी मध्यरात्री याच कारणावरुन पुन्हा एकदा घरात जोरदार मांडण झाले. वादाचे रूपांतर टोकाच्या रागात झाले आणि जगदीशने संतापाच्या भरात आईच नाक, तोंड आणि गळा यावून धरले. श्वास कोंडल्यामुळे संगीता झेंडे यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या प्राथनिक तपासात समोर आले.

Advertisement
Tags :

.