For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kupwad police | कुपवाड पोलिसांचे धडाकेबाज 'कोंबिंग ऑपरेशन'; सोशल मीडियावर दहशत माजवणारे १४ गुंड गजाआड

12:33 PM May 05, 2026 IST | NEETA POTDAR
kupwad police   कुपवाड पोलिसांचे धडाकेबाज  कोंबिंग ऑपरेशन   सोशल मीडियावर दहशत माजवणारे १४ गुंड गजाआड
Advertisement

                 कुपवाड पोलिसांचे धडक कोंबिंग ऑपरेशन; १४ जण ताब्यात

Advertisement

कुपवाड : कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने अत्यंत गोपनीय आणि धडाकेबाज 'कोंबिंग ऑपरेशन' मोहीम राबवून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांचे धाबे दणाणून सोडले. सोशल मीडियावर शस्त्रांसह व्हिडिओ बनवून आणि परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळक्यांना पोलिसांनी चांगलेच बठणीवर आणले.

तब्बल १४जणांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी दिली.अटक केलेल्यांमध्ये चिंतामणी चंद्रकांत कांबळे (रा. यशवंतनगर), समीर मोहब्बतपठाण (हनुमाननगर, कवलापूर), बाब्या संपत दुधाळ (दत्तनगर, बामणोली), अमीर बाबाजी मगदूम (दत्तनगर), शकील सरदार मगदूम (दत्तनगर), सुशांत सुनील आबळे (दत्तनगर), ज्ञानेश्वर गणपती पाटील, रोहन गणपती पाटील, उमर समीर शेख(बजरंगनगर) यांचा समावेश आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासूनत सोशल मीडियावर काही तरुण आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून आणि परिसरात भाईगिरीचे प्रदर्शन करून सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करतअसल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली होती. या गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी कुपवाड पोलिसांची यंत्रणा सतर्क झाली होती. र सोमवारी पहाटे कारवाईचा बडगा उगारण्यात आला.सोमवारी पहाटे कुपवाड पोलिसांनी अचानक कोंबिंग ऑपरेशनला सुरुवात केली. संशयास्पद ठिकाणी आणि गुन्हेगारांच्या घरात आणि अड्ड्यांवर पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईमुळे गुन्हेगारांची पळापळ झाली, मात्र, पोलिसांनी परिसराला वेढाघातल्यामुळे कोणालाही पळ काढता आला नाही.

या धडक मोहिमेत पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या त्या सर्व तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आहे. यामध्ये काही सराईत गुन्हेगारांचाही समावेश असून, त्यांच्यावर पोलिसांनी कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. इतर तरुणांना पोलिसांनी 'खाकी'चा इंगा दाखवत कडक समज दिली असून, पुन्हा असे प्रकार घडल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे.

Advertisement
Tags :

.