For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुणकेरी शाळा नं १ चा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

05:18 PM Apr 08, 2026 IST | अनुजा कुडतरकर
कुणकेरी शाळा नं १ चा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
Advertisement

विद्यार्थ्यांच्या 'ओंजळ' या हस्तलिखिताचे प्रकाशन

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
कुणकेरी शाळा नं १ चा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सभापती सुष्मिता जाधव, कोलगाव जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, गटशिक्षणाधिकारी सविता परब, कुणकेरी सरपंच सोनिया सावंत, उपसरपंच सुनिल परब, देवस्थान कमिटी अध्यक्ष सूर्यकांत सावंत, सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन राजन रेडकर, पोलीस पाटील तानाजी सावंत, केंद्रप्रमुख भावना गावडे, ग्रामपंचायत सदस्य जितेश कुणकेरकर, अनुराधा गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश परब, शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कदम आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सभापती सुस्मिता जाधव यांनी पुस्तकाच्या बाहेर जावून चार भिंती बाहेरच्या जीवनातील जीवनानुभव देणारे शैक्षणिक उपक्रम कुणकेरी शाळा नं.१ मध्ये प्रत्यक्ष पाहता आलेत. मुख्याध्यापक विठ्ठल कद‌म व त्यांच्या सहकारी शिक्षकानी राबविलेले विविधांगी उपक्रम शालेय मुलांमधील सृजनशीलता विकसित करणारे असल्याचे सांगितले. तर मायकल डिसोजा यांनी कुणकेरी शाळा नं. १ ही नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमात नेहमीच अग्रस्थानी असुन आजपर्यंत अनेक आदर्श विद्यार्थी घडविले आहे. त्यामुळे या शाळेच्या उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी व्यासपीठावरील इतर उपस्थित मान्यवरांनाही या शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक करून शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी दरवर्षी प्रमाणे यावर्षी मुलांनी निर्माण केलेले ओंजळ या हस्तलिखित पुस्तकाचे प्रकाशन सभापती सुष्मिता जाधव आणि जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा व परीक्षा यामध्ये यश संपादन केलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील शैक्षणिक प्रगतीची विशेष नोंद ठेवत या विद्यार्थ्यांना वृक्षमित्र, प्राणीमित्र, ग्रंथमित्र, ज्ञानदूत, स्वच्छतामित्र, अभ्यासमित्र अक्षरमित्र, समाजमित्र, कलामित्र, तंत्रस्नेही अशा विशेष पुरस्काराने मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले.या कार्यक्रमात सभापती सुष्मिता जाधव, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, गटशिक्षणाधिकारी सविता परब, यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कदम यांनी केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.