कुंडलचे महाराष्ट्र कुस्ती मैदान 9 फेब्रुवारीला : बाळासाहेब लाड
कुंडल :
कुंडल येथील गेली 102 वर्षांची परंपरा असणारे महाराष्ट्र कुस्ती मैदान यंदा 9 फेब्रुवारी रोजी आयोजित केल्याची माहिती सार्वजनिक गणेशोत्सव यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली
यावेळी लाड म्हणाले यापूर्वी कुस्ती मैदान अनंत चतुदर्शीनंतर येणाऱ्या रविवारी भरत होते. परंतु पावसामुळे सलग तीन वर्षे मैदान होऊ न शकल्याने यात्रा कमिटी व सर्व प्रमुख नेते मंडळी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन गणेश जयंती नंतर येणाऱ्या रविवारी यात्रा व कुस्ती मैदान घेण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे गेली दोन वर्षे गणेश जयंती नंतर येणाऱ्या रविवारी मैदान भरवत आहोत.
यावर्षी 1 फेब्रुवारी रोजी गणेश जयंती येते व 2 फेब्रुवारी रोजी मैदान येत होते मात्र 2 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र केसरी स्पर्धा असल्याने नामवंत मल्ल या कुंडलच्या महाराष्ट्र कुस्ती मैदानात हजर रहावू शकणार नसल्याने सदरची यात्रा व कुस्ती मैदान 9 फेब्रुवारी 2025 रोजी होणार असून मैदानासाठी मराष्ट्रासह इतर राज्यातील मल्लांनी व कुस्ती शौकिनांनी हजर रहावे, असे आवाहन केले. या मैदानासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मल्ल हजर असतात. या पत्रकार परिषदेस यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष हिम्मत पवार, सचिव मुकुंद जोशी, खजिनदार अशोक पवार ,सह खजिनदार विश्वास पवार, विश्वास लाड रघुनाथ भिसे प्रमुख उपस्थित होते.