कुंडई औद्योगिक वसाहतीतील भंगार अड्ड्याला भीषण आग; पाच तासांच्या प्रयत्नांनंतर नियंत्रण; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न
11:30 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
कुंडई : कुंडई औद्योगिक वसाहतीमधील एका भंगार अड्ड्याला सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल पाच तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.
आगीची तीव्रता लक्षात घेऊन घटनास्थळी दहा अग्निशमन बंब तैनात करण्यात आले होते. अग्निशमन जवानांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. भंगार अड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य असल्याने आग विझविण्यासाठी जवानांना विशेष मेहनत घ्यावी लागली.
Advertisement
या आगीत भंगार अड्ड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता असून, आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.
Advertisement
Advertisement
